Ravindra Shinde BJP cdcc bank chairman । 🎯 फडणवीसांना वाढदिवसाचं खास गिफ्ट – CDCC बँकेत भाजपचा अध्यक्ष

Ravindra Shinde BJP cdcc bank chairman

काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला – CDCC बँकेवर भाजपचा झेंडा

Ravindra Shinde BJP cdcc bank chairman : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे रवींद्र शिंदे तर उपाध्यक्ष पदावर संजय डोंगरे यांची निवड झाली आहे. बँकेवर भाजपचा अध्यक्ष हे मुख्यमंत्री फडणवीस यांना वाढदिवसाचं गिफ्ट आहे, अशी प्रतिक्रिया आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी दिली.

ताडोबा जंगलात सफारीला येताय, आता महिलांसाठी सुविधा केंद्र

२२ जुलै रोजी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती, २१ संचालक असलेल्या बँकेत अध्यक्ष रवींद्र शिंदे व उपाध्यक्ष संजय डोंगरे हे निर्विरोध निवडून आले. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करन देवतळे आदींची यावेळी उपस्थिती होती. Devendra Fadnavis birthday political gift BJP

भ्रष्टाचाराच्या वेढ्यात अडकलेल्या मध्यवर्ती बँकेत काही महिन्यापूर्वी भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे आरोप करण्यात आले होते, सदर प्रकरण आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनात लावून धरले होते, अखेर भरती प्रक्रियेची एसआयटी चौकशी ची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. तब्बल १३ वर्षांनी मध्यवर्ती बँकेत पार पडलेल्या निवडणुकीत २१ संचालक कांग्रेस व भाजप प्रणित निवडून आले मात्र दोन्ही पक्षांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता.

एकावेळी भाजपात प्रवेशाने कांग्रेस गारद

पण ऐनवेळी उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश घेत कांग्रेसचे सत्तेचे गणित बिघडवून टाकले आणि स्वतः अध्यक्षपदी विराजमान झाले, शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने कांग्रेस पक्षाला मोठा धक्का हादरा बसला, विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत खासदार प्रतिभा धानोरकर या संचालक पदी निवडून आल्या होत्या. अनेक वर्षे कांग्रेसच्या ताब्यात असलेल्या मध्यवर्ती बँकेत प्रथमच भाजपने बाजी मारली. यावेळी आमदार भांगडिया यांनी मध्यवर्ती बँकेत भाजपचा अध्यक्ष हे आमचं त्यांना वाढदिवसाचं गिफ्ट आहे अशी प्रतिक्रिया दिली. Congress loses Chandrapur bank to BJP

आज निर्विरोध निवडून आलेले अध्यक्ष शिंदे व उपाध्यक्ष डोंगरे यांच्या सत्कार कार्यक्रमात आमदार मुनगंटीवार व आमदार देवराव भोंगळे हे अनुपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीची जबाबदारी जिल्ह्यातील ५ भाजप आमदार यांच्याकडे होती मात्र २ आमदारांनी यामध्ये सहभाग नोंदविला नाही अशी चर्चा भाजपात रंगली आहे. आमदार भांगडिया, आमदार जोरगेवार व आमदार देवतळे यांनी किल्ला लढवीत मध्यवर्ती बँकेत भाजपची सत्ता खेचून आणली. बँकेच्या यशामागील भाजपचे खरे किंगमेकर आमदार भांगडिया व जोरगेवार ठरले.

Sharing Is Caring:

Leave a Comment