Rajan matka Sara matka fraud cases
Rajan matka Sara matka fraud cases : चंद्रपूर – कधी काळी शहराच्या कोपऱ्यांवर चालणारा जुगार आता मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचला आहे. ‘राजन मटका’ आणि ‘सारा मटका’ यांसारख्या ऑनलाईन जुगाराच्या ॲप्स आणि वेबसाईटनी चंद्रपुरातील तरुणांना ‘झटपट श्रीमंत’ होण्याचे आमिष दाखवून अक्षरश: कर्जबाजारी केले आहे. या ऑनलाईन जुगारात फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून, कायद्याची अंमलबजावणी करणेही अवघड झाले आहे. mobile matka betting fraud
चंद्रपुरात बस चा भीषण अपघात एक ठार
झटपट पैशाचे आमिष आणि फसवणुकीचे प्रकार
पारंपरिक जुगाराप्रमाणेच या ऑनलाईन मटक्यातही एका किंवा दोन आकड्यांवर पैसे लावले जातात. मात्र, या ॲप्स आणि वेबसाईटच्या माध्यमातून जुगार चालवणारे लोक कमी पैशांवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवतात. याच आमिषाला बळी पडून अनेक तरुण मोठ्या रकमेची पैज लावतात. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे, जर एखादा क्रमांक जिंकण्याची शक्यता जास्त असेल, तर जुगार चालवणारे ऑनलाईन पद्धतीने तो क्रमांक बदलून टाकतात. त्यामुळे जिंकलेला नंबरही हरल्याचे दाखवले जाते. online matka gambling scams
तक्रार करायची कुठे?
ऑनलाईन जुगारातील ही फसवणूक एका अदृश्य जाळ्यात चालते. यात कुणीही थेट तक्रार करू शकत नाही, कारण हा व्यवहार ऑनलाईन आणि बेकायदेशीर असतो. देशात जुगारबंदी असूनही ऑनलाईन माध्यमातून हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, हे ॲप्स आणि वेबसाईट अनेकदा परदेशातून किंवा इतर राज्यांतून चालवले जातात, ज्यामुळे स्थानिक पोलिसांना कारवाई करणे अवघड जाते.
यामुळेच चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक युवक जुगाराच्या या विळख्यात अडकले आहेत. पैशांच्या या व्यसनामुळे अनेकांनी आपली कमाई आणि संपत्ती गमावली आहे. अनेक कुटुंबांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे, तर काही ठिकाणी यातून आत्महत्या झाल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत.

या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष देण्याची गरज असून, केंद्र सरकारने या ऑनलाईन जुगाराच्या वेबसाईट आणि ॲप्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.