chandrapur crime branch action
chandrapur crime branch action : चंद्रपूर ११ सप्टेंबर २०२५ – नवीन घराचे बांधकाम सुरु असताना अज्ञात आरोपींनि घराच्या पेंटिंगसाठी लागणारे पेन्टचे डब्बे व इलेकट्रीक साहित्याची चोरी केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली, मात्र या प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत करीत २ आरोपीना अटक करीत तब्बल ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरात पहाटे धक्कादायक दुर्घटना
चंद्रपूर जिल्ह्यात चोरी, घरफोडी, अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा मोहीम राबवित आहे, या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाने १० सप्टेंबर रोजी पेन्टचे डब्बे व इलेकट्रीक साहित्यांची चोरी करणाऱ्या आरोपीना अटक केली. पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या ५४ वर्षीय धीरज ठाकूर यांच्या नव्या घराचे बांधकाम महाकाली नगर २ मध्ये सुरु होते. यावेळी नव्या घरासाठी पेंटिंग व इलेक्ट्रिक फिटिंग साठी लागणारे साहित्य घरी आणून ठेवले होते. मात्र १० सप्टेंबर बुधवारी अज्ञातांनी ते साहित्य लंपास केले. याबाबत ठाकूर यांनी पडोली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद नोंदवली. quick police action
गुन्हे शाखेची शिताफी आणि गुन्हा उघड
गुन्हा दाखल होताच सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पथकाने सुरु केला, पडोली परिसरात दोघेजण पेन्टचे डब्बे व इलेक्ट्रिक साहित्य विकण्यासाठी फिरत आहे, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली असता ठाकूर यांच्या घरी झालेली चोरी त्यांनी केली असल्याचे कबूल केले. electric supplies stolen Chandrapur arrest
गुन्हे शाखेने आरोपी २९ वर्षीय शादाब शब्बीर सैफी राहणार नेरी वार्ड दुर्गापूर व २८ वर्षीय सोहेल कादिर सय्यद नेरी वॉर्ड दुर्गापूर यांना अटक केली, दोघांना पडोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी गुन्हे शाखेने चोरी केलेला माल व गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि दीपक कांक्रेडवार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार व मिलिंद टेकाम यांनी केली.