Illegal cattle transport Maharashtra । गोवंश तस्करीवर चंद्रपूर पोलिसांचा चाप – लाखोंचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

Illegal cattle transport Maharashtra

Illegal cattle transport Maharashtra : चंद्रपूर ११ ऑक्टोबर २०२५ – (NEWS ३४ वृत्तसेवा) – तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंश जनावराची चंद्रपूर पोलिसांनी सुटका करीत ३ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत १८ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत २५ गोवंश जनावरांची प्यार फाउंडेशन कडे रवानगी करण्यात आली.

Also Read : खड्डेमुक्त चंद्रपूर साठी खासदार धानोरकरांची भन्नाट कल्पना

११ ऑक्टोबर रोजी उमरी पोतदार पोलिसांना पहाटेच्या सुमारास गोवंश जनावरांच्या तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली, माहिती प्राप्त होताच पोलिसांनी मौज डोंगर हळदी मार्गावर सापळा रचत नाकेबंदी केली, यावेळी २ पिकअप वाहनांना थांबविता झडती घेतली असता त्यामध्ये २५ गोवंश जनावरे कत्तलीकरिता नेत असल्याचे आढळले. Chandrapur police news

३ आरोपींवर गुन्हे दाखल

यावेळी जनावरांना कोंबून क्रूरपणे नेण्यात येत होते, पोलिसांनी आरोपी २८ वर्षीय मंगेश शामराव चौधरी राहणार लक्कडकोट, २७ वर्षीय राजेश गजानन घोगरे राहणार बेंबाळ, २४ वर्षीय मोहम्मद अजीज अली राहणार वाकडी यांच्याविरुद्ध कलम ११ (१), (घ), (ड), (च), (ज) भारतात प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, सहकलम ५ (अ), ९, ११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, कलम ३२५, ३ (५), ९ भारतीय न्याय संहिता अन्व्ये गुन्हा दाखल करीत गुन्ह्यात वापरलेले वाहन क्रमांक TS२०-T-४९६७ व MH३४-BZ_८४२५, २५ गोवंश जनावर सह ४ नग मोबाईल असा एकूण १८ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात उमरी पोतदार चे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी सुभाष राऊत, सतीश झाडे, विनोद चौधरी, राहुल शंखावार, सूरज बुजाडे, दिनेश देवाडे व गोपाल घुमडेवाड यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment