Kishor Jorgewar Ghugus infrastructure directives । घुग्घुसच्या विकासकामांचा आढावा; शुद्ध पाणी आणि स्वच्छ रस्त्यांसाठी आमदार जोरगेवारांचा पुढाकार

Kishor Jorgewar Ghugus infrastructure directives

Kishor Jorgewar Ghugus infrastructure directives : चंद्रपूर ११ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – आज शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घुस नगरपरिषदेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

Also Read : २० कोटी रुपयांच्या निधीतून चंद्रपुरातील मार्गाचा होणार कायापालट

यावेळी घुग्घुस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर, नगर अभियंता मनीष जुनघरे, कार्यालय अधीक्षक निलेश तुरानकर, भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, भाजप नेते प्रकाश देवतळे, संतोष नुने, आशिष मासिरकर, हेमंत उरकुडे, स्वप्निल वाढई, साजन गोहणे, महेश लठ्ठा, श्याम आगदारी, मयूर कलवल, राजेश मोरपाका, मल्लेश बल्ला, विजय माथनकर, मुन्ना लोडे, गुरुदास तगरपवार, विनोद लाटेवार आदींची उपस्थिती होती. Ghugus development meeting

नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे अत्यावश्यक

बैठकीदरम्यान आमदार जोरगेवार म्हणाले की, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत आणि स्वच्छ ठेवणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे अत्यावश्यक असून त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये. तसेच शहरातील बंद पडलेले वीज दिवे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देत रस्त्यांची डागडुजी करून नागरिकांना सुलभ वाहतुकीची सुविधा मिळावी, यावर त्यांनी भर दिला.

यावेळी त्यांनी नगरपरिषदेच्या नव्या विकास आराखड्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच अलीकडील भूस्खलनात बाधित झालेल्या १६५ घरांतील नागरिकांचे तात्काळ पुनर्वसन करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. नगरपरिषदेच्या निधीचा वापर करताना शहराच्या सर्वसमावेशक आणि संतुलित विकासाचे ध्येय ठेवावे, कोणताही भाग विकासापासून वंचित राहू नये, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले. या बैठकीला संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

Sharing Is Caring:

Leave a Comment