flood affected farmers : पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक पॅकेज द्या

flood affected farmers भोयेगाव वर्धा नदीवर मोठ्या उंचीचा पूल बांधा, पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आथिर्क पॅकेज द्याभूषण फुसे व शिष्ट मंडळाची निवेदनाद्वारे मागणी

Flood affected farmers कोरपना – कोरपना तालुक्यातील गडचांदूरला चंद्रपूरशी जोडणाऱ्या भोयेगाव येथील वर्धा नदीचा पूल कमी उंचीचा असल्यामुळे पावसाळ्यात वर्धा नदीची पाण्याची पातळी थोडीशीही वाढली कि सदर पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरून रहदारी बंद होते. त्यामुळे वाहनचालकांना राजूराहून अधिक अंतर गाठून चंद्रपूरला जावे लागते. कोरपना तालुक्यात मोठ्या चार सिमेंट कंपन्या, कोळसा खाणी व त्यांच्याशी निगडित असल्याने या मार्गावरून वाहतूक खोळंबल्याने त्रास सहन करावा लागतो. याकरिता भोयेगाव वर्धा नदीवर मोठ्या उंचीचा पूल बांधण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील 167 आदिवासी गावांचा होणार कायापालट

तसेच यावर्षीच्या सततच्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला तीन वेळा पूर आल्याने नदीकाठच्या शेती पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरपीडित शेतकऱ्यांना शासनातर्फे कोणतीही मदत मिळालेली नाही. शेतकरी हवालदिन झालेला असून मानसिक रित्या खचला आहे. तसेच अनेक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येकडे प्रवृत्त होत असल्याचे दिसून येत आहे. Flood affected farmers

शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांचे मनोबल वाढवावे. अश्या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना कोरपना चे तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले. सदर रास्त मागणीला सरकार व प्रशासनाने सकारात्मक प्रदिसाद दिला नाही तर सर्व पीडित सर्व शेतकऱ्यांसोबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी दिला आहे. निवेदन देताना रामदास चौधरी, भोयेगाव, प्रवीण पेंदोर, सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे व सहकारी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!