Deaf Mute School : विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आमदार जोरगेवार यांची तत्परता

Deaf Mute School मूक व बधिर शैक्षणिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था द्वारा संचालित मूक बधिर निवासी विद्यालय बाबूपेठ चंद्रपूर मध्ये शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याने शासनाने सदर निवासी शाळेची मान्यता काढत कायमची बंद केली. शाळा बंद झाल्याने शाळेतील 100 मूक बधिर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले.


Deaf Mute School सदर शाळा सुरू व्हावी यासाठी अनुपम बहुद्देशीय सामाजिक संस्था द्वारे जिल्हा परिषद चंद्रपूर समोर पालक व विद्यार्थ्यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. सदर आंदोलन संस्था अध्यक्ष रमाकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

महत्वाचे : चंद्रपूर शहरातील हा मार्ग 28 सप्टेंबर रोजी राहणार बंद


यादव यावेळी म्हणाले की चालू सत्रात शासनाने शाळा बंद करण्याऐवजी प्रशासकाची नियुक्ती करायला हवी होती मात्र तसे न करता थेट शाळा बंद केली, किंवा इतर संस्थेला शाळा हस्तांतरित करणे गरजेचे होते मात्र तसे काही झाले नाही.


त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीना बडतर्फ करावे, संस्थेची नोंदणी रद्द करावी, या मागण्या घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. (Deaf Mute School)


धरणे आंदोलनाबाबत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील आमदार किशोर जोरगेवार यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ धरणे आंदोलन मंडपाला भेट देत आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. व त्यांनी सदर मूक बधिर शाळा तात्काळ सुरू व्हावी यासाठी केलेल्या पाठपुरावा बाबत आंदोलकांना माहिती देत लवकरात लवकर शाळा सुरू करणार असल्याचे आश्वासन आंदोलकाना आमदार जोरगेवार यांनी दिले.


30 ऑगस्ट रोजी शासनाने शाळा बंद करण्याचा आदेश जारी केला, 3 सप्टेंबर रोजी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे सदर मूक बधिर निवासी विद्यालय लोक कल्याण बहुद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरी यांना हस्तांतरण करावे अशी विनंती केली.
विशेष म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पत्राची मुख्यमंत्री शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेत सदर लोक कल्याण शिक्षण संस्थेबाबत अहवाल सादर करावा असे निर्देश दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांना दिले, त्यामुळे मूक बधिर निवासी शाळा तात्काळ सुरू होणार अशी आशा निर्माण झाली आहे, यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांनी आमदार किशोर जोरगेवार यांची विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रति असलेली तत्परता बघत त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी अनुपम संस्थेचे अध्यक्ष रमाकांत यादव यांनी, आमदार किशोर जोरगेवार व मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद यांना मागण्यांचे निवेदन दिले, मागण्या 15 दिवसांच्या आत पूर्ण झाल्या नाही तर रमाकांत यादव यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करू असा इशारा यावेळी दिला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!