chandrapur accident : चंद्रपुरात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी

chandrapur accident बल्लारपूर वरून चंद्रपूर शहरात जाणाऱ्या मार्गावर 30 सप्टेंबर रोजी थर्माकोल ने भरलेला ट्रक रस्त्यावरील माती धसल्याने पलटी झाला.

Chandrapur accident सप्टेंबर रोजी बल्लारपूर वरून वर्धा जाण्यासाठी निघालेल्या ट्रक क्रमांक MH34 BZ 3650 हा दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लालपेठ एच पी गॅस सेंटर जवळ पोहचला असता वाहन चालकाने सदर ट्रक थांबवित रस्त्याच्या कडेला वाहन उभे ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणात रस्त्याच्या कडेवरील माती धसल्याने ट्रक पलटी होत बाजूच्या खड्ड्यात पडला.

ट्रक पलटी

महत्त्वाचे : 1 ऑक्टोबर रोजी चंद्रपुरातील हे मार्ग बंद

ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोल होते, ट्रक पलटी झाल्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत वाहन चालकाला बाहेर काढले, चालक किरकोळ जखमी झाला आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी सदर मार्गावर गर्दी नव्हती अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!