Chitra Wagh : कोरपना अत्याचार प्रकरणात खासदार धानोरकर गप्प का? – चित्रा वाघ यांचा प्रश्न

chitra wagh कोरपना शहरातील नामांकित शाळेत 12 वर्षीय मुलीवर शिक्षकाने गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याची धक्कादायक बाब 1 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने या गंभीर प्रकरणात तत्परता दाखवीत आरोपी अमोल लोडे ला अकोला येथून अटक केली. मात्र या सर्व प्रकरणावर खासदार धानोरकर अजूनही गप्प का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला.


Chitra wagh आरोपीला फाशी ची शिक्षा द्यावी यासाठी स्थानिक नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला. त्यानंतर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.
सदर नामांकित शाळेच्या संचालक मंडळात अमोल लोडे यांच्या कुटुंबाचा सुद्धा समावेश असून नुकतीच आरोपी लोडे यांची कोरपना युवक कांग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती. chitra wagh

अवश्य वाचा : चंद्रपुर शासकीय आयटीआय चे नाव बदलले


4 ऑक्टोबर रोजी भाजप महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ कोरपण्यात दाखल होत पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर दिला.
आरोपीला कठोर शासन होण्यासाठी सरकार आपल्या सोबत आहे असा विश्वास त्यांना दिला. chitra wagh

चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद


चंद्रपूर शहरात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला, त्या म्हणाल्या की आज या गंभीर प्रकरणावर सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, सुषमा अंधारे चकार शब्द बोलल्या नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा या प्रकरणावर गप्प आहे, रोज 7 ते 8 ट्विट करणारे वडेट्टीवार यांचं याबाबत ट्विट का नाही, असा सवाल वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.


राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकान मध्ये हे काय चाळे सुरू आहे, चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर या एक महिला असून त्यासुद्धा या प्रकरणी का बोलत नाही? आरोपी हा कुणी पण असो, कोणत्याही पक्षाचा तो आरोपी आहे, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे, या प्रकरणी अजून पीडित आहेत का? आरोपीला वाचविण्याचा कुणी प्रयत्न केला? याचा तपास पोलीस करीत असून लवकरच यामागील सत्य समोर येणार अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!