Christian society : ख्रिस्ती समाजबांधवांचा कफन पेटी मोर्चा

Christian society (गुरू गुरनुले)मुल – गेल्या ४० वर्षापासून ख्रिस्ती समाजाच्या दफनविधीसाठी जागा दिली नाही.करीता मागणीचे निवेदन आम्ही सेट स्टिफन चर्च मुल तर्फे अनेक पत्र दिले परंतु पत्राला केराची टोपली दाखवली, असता ख्रिस्ती समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.असा इशारा सुद्धा मोर्चाच्या निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला.

महत्वाचे : 200 युनिटचे काय झालं? स्वतः आमदार जोरगेवार यांनी सांगितलं सत्य

Christian society दफनविधीसाठी जागा मिळण्यासाठी वेळोवेळी सूचना तसेच पत्र व्यवहार करून सुद्धा प्रशासना‌द्वारे न्याय मिळाला नसल्याने आज दिनांक ७/१०/२९२४ रोजी चर्च ते गांधी चौक मार्ग तहसील कार्यालयाच्या ख्रिस्ती बांधवांचा आकर्षक कफन पेटी मोर्चा काढण्यात आला असून संपूर्ण मोर्चा द्वारे खिस्ती समाज मूल तालुका तर्फे कफन पेटी मोर्चा काढून प्रशासनास जागे करण्यासाठी स्मरण करून देत जागेची मागणी केली आहे, आणि सूचना करण्यात आली की येणाऱ्या दिवसात समाजात कोणचेही मृत्यू झाल्यास त्याला दफन कुठे करायचे आहे याचे उत्तर द्यावे, अन्यथा तहसील कार्यालयावर मृतदेह आणण्यात येईल. व त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील.असा गंभीर इशारा दिला आहे.

सेंट स्टीफन चर्च मूल, व समस्त ख्रिस्ती समाज बांधवांचा कफन पेटी मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले. याप्रसंगी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कांग्रेस नेते, सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष,माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत, यांनी प्रशासनाने आपल्याला रस्त्यावर यायला भाग पाडले.असे मत व्यक्त केले. व आपला जाहीर पाठिंबा दिला. Christian society

उलगुलान संघटनेचे राजू झोडे यांनी जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांवर टीका करीत जो जमीन सरकारी है, ओ जमीन हमारी है.असे समजून अतिक्रमण करण्याचा सल्ला दिला. तर मोर्चाचे नेतृत्व करणारे डॉ.मार्टिन अझीम यांनी गेल्या ४० वर्षांपासूनचा आमचा संघर्ष आहे. तरी देखील शासन व प्रशासन जागे झाले नाही. पण ते आम्हीं आता सहन करणार नाही असे मार्गदर्शन केले. Christian society

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदाणी, सभापती राकेश रत्नावार, तालुकाध्यक्ष गुरु गुरनुले, एथोनी परीछा, डॉ.मार्टिन अझीम, आश्र्विंन पालीकर, हरिदास मेश्राम, यांनीही सत्ताधाऱ्यांवर सडाडून टीका केली. मंचावर डेव्हिड वाळके, अशोक टी टीगुसले, वसंत खोब्रागडे, दिलीप वराते,राजेश मोजेश, संतोष इटकलवार यांचेसह शेकडो ख्रिस्ती बांधव व महिला उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!