tadoba tiger : मूल तालुक्यात वाघांची दहशत कायम

tadoba tiger बोरचांदली शिवारात वाघाची दहशत आजही कायम, वाघाचा बंदोबस्त केला नाही तर पुन्हा आंदोलन – संतोषसिंह रावत

tadoba tiger (गुरू गुरनुले) मुल – तालुक्यातील बोरचांदली येथील शेतकरी शैलेश प्रभाकर कटकमवार वय वर्ष (४२) हा ३० सप्टेम्बर २०२४ रोजी म्हैसी उमा नदी काठावर सावली वनपरिक्षेत्रात चारत असताना जवळच त्याला वाघ दिसला. त्या वाघाला घाबरून शैलेशने म्हैसीची शेपटी पकडून पाण्यात उडी मारली. व त्याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना दुसऱ्याच दिवशी परत मृतक शैलेश कटकमवार यांचे गुरे त्याच क्षेत्रात चरत असताना गोऱ्यावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली.

अवश्य वाचा : ख्रिस्ती बांधवांचा कफन पेटी मोर्चा

दोनच दिवसात मालकही गेला आणि त्याचा गोराही गेला.अजूनही त्याच परिसरात वाघ असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले आहे.त्याच बोरचांदली परिसरात राजू पाटील येनुगवार यांचे शेती फार्म आहे. त्याच परिसरात तोच वाघ दहशत पसरवीत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव व गावकरी वाघाच्या दहशतीने भीत आहेत. वाघाच्या भीतीमुळे काही शेतकरी बांधव शेतात पीक उभे असताना सुद्धा शेतीकडे जाणे बंद केले आहे. (Tiger)

हाच तो भीती दाखवणारा वाघ उमा नदीच्या फुलाच्या उजव्या बाजूला अंतरगाव पारडंवाही क्षेत्र आहे. त्याही परिक्षेत्रात हाच वाघ सारखा फिरत असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितल्याने वाघाची दहशत कायम आहे. करीता वाघ (tiger) हा कोणत्याही परिक्षेत्रात फीरो, पण त्याचा बंदोबस्त करणे व शेतकऱ्यांना व नागरिकांना आणि शेतकऱ्यांच्या गुरेढोरांना संरक्षण देणे ही सर्वस्वी जबाबदारी मात्र वनविभागाची असल्याने अशी दहशत माजविणाऱ्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा.अन्यथा शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा मला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल. असा इशारा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी दिला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!