Haji Sarwar massacre : हाजी सरवर हत्याकांड, तो नेता कोण?

Haji Sarwar massacre ऑगस्ट महिन्यात चंद्रपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवीत भरदिवसा क्रूर हत्याकांडाची घटना घडली, यामध्ये कुख्यात गुंड हाजी सरवर यांची गोळ्या घालून व धारदार शस्त्राचे वार करीत हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखेत आत्मसमर्पण केले होते, पोलिसांनी याप्रकरणी अनेक आरोपीना अटक केली.

महत्त्वाचे : चंद्रपुरात आज बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम, प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांची उपस्थिती


Haji Sarwar massacre नकोडा निवासी हाजी सरवर शेख यांचा 12 आगस्ट 2024 ला बिनबागेट, येथील होटल शाही दरबार येथे गोळया झाडुन तीक्ष्ण हत्यारांने निर्मम हत्या करण्यात आली होती. सदर प्रकरणात आता पर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार आहे. या प्रकरणात मुलाचा खुण करण्यामागे कोणाचा हात आहे आणि कोण सदर आरोपींना आर्थिक मदत देत होता व त्यांना शस्त्र कोण पुरविले? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे, याबाबत हाजी सरवर यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक आरोप व खुलासे केले आहे.

यासंदर्भात सीआईडी तपास करण्याची मागणी सलमा बेगम सरवर शेख यांनी पत्रकार परीषदेत केली आहे.
घटनेपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात अग्निश्स्त्रांचा वापर करून खून करणे किंवा खुनाच्या प्रयत्न करणे सारखे गुन्हे सतत घडत होते. त्यामुळे जिल्हा पोलीस विशेषतः स्थानिक गुन्हे शाखा यांनी शस्त्र जप्तीची मोहिम राबविली होती व सावधानता बाळगल्याचे जनतेला सांगण्यात आले होते. (Haji Sarwar massacre)

राजकीय : डॉ.अभिलाषा गावतुरे यांना कांग्रेस पक्षाची बल्लारपूर विधानसभेतून उमेदवारी द्या, या पक्षाचा जाहीर पाठिंबा

हाजी सरवर चे मारेकरी शस्त्र घेवून दुस_या जिल्ह्यातून चंद्रपूर शहरात दाखल झाले, दोन दिवस मुक्काम केला. तेव्हा पोलीस व अपराध शाखा पूर्णत अनभिज्ञ कसे होते? खून केल्यानंतर जवळचे शहर पो. स्टे. किंवा रामनगर पो. स्टे सोडून मारेकरी सरळ स्थानीय गुन्हा शाखा येथे का गेले?. (Haji Sarwar massacre)

पत्रकार परिषद

आरोपी समीर हा सराईत गुन्हेगार आहे. चंद्रपूर जिल्ह्या बाहेर इतर खुनाचे गुन्हे नोंद आहेत. तो गुन्हा केल्यानंतर तिथेच आत्मसमर्पण करतो जिथे पहिले पासून त्याचा संपर्क असतो व सर्वकाही ठरलेला प्लान होता. सर्व बाबींचे विचार केले असता स्था. गु. शाखेची भूमिका हि संशयास्पद आहे. म्हणून स्था. गु. शाखेचे भूमिकेची सखोल तपास होणे गरजेचे आहे. तसेच स्था. गु. शा. पूर्वी पासून आरोपींचा संपर्कात होते किंवा कसे हे जाणून घेण्याकरीता त्यांचे CDR व SDR काढणे सुद्धा गरजेचे आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून हाजी सरवर खुनाचा गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआईडी) कडून किंवा स्वतंत्र तपास यंत्रणे कडून करण्याची मागणी हाजी सरवर ची पत्नी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. (Haji Sarwar massacre)

त्या पुढे म्हणाल्या की वर्ष 2012 मध्ये हाजी सरवर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता? त्यांचा सुद्धा या प्रकरणात सहभाग असू शकतो हे पोलिसांनी आपल्या तपासात घ्यायला हवे, आरोपी समीर हा ज्या वाळू घाटावर काम बघत होता तो घाट एका नेत्याचा आहे, तो त्याची पाठराखण करायचा, त्याबाबत त्या नेत्याचा यामध्ये सहभाग असू शकतो? यावर पोलिसांनी सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, या हत्याकांडाचा मास्टरमाइंड कोण? याबाबत पोलिसांनी खुलासा करावा, जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मी माझे मूल बाळ सोबत घेत पोलीस अधीक्षक कार्यालय पुढे आमरण उपोषण करणार असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!