Chandrapur parking : शहरातील हे ठिकाण पार्किंग स्थळ म्हणून घोषित

Chandrapur parking 15 व 16 ऑक्टोबर 2024 रोजी होणा-या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभुमी येथील समारंभास उपस्थित राहण्याकरीता शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनुयायी / नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Chandrapur parking त्यामुळे सदर परीसरात वाहतूक कोंडी, समारंभास येणा-या अनुयायांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ नये, तसेच प्रवेश व निर्गम याचे विनियमन करण्याकरीता चंद्रपूर शहर आणि बाहेरून येणा या वाहनांकरीता तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग स्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

राजकिय : 185 क्रिकेट संघाला क्रिकेट किट चे वितरण

त्यानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी 15 ऑक्टोबरच्या सकाळी 7 वाजतापासुन 17 ऑक्टोबरचे सकाळी 7 वाजेपर्यंत चंद्रपूर हद्दीतील खालील नमुद स्थळे सर्व वाहनाकरीता “पाकींग स्थळ” म्हणून घोषित केले आहे.

1. नागपूर रोडने दीक्षाभुमीकडे येणा-या वाहनांकरीता : अ) शकुंतला लॉन ब) जनता कॉलेज पटांगण क) जनता कॉलेज समोरीत ईदगाह मैदान.

2. शहरातून दिक्षाभुमी कडे येणा-या वाहनांकरीता : अ) सेंट मायकल स्कूल मैदान ब) सिंधी पंचायत भवन (संत केवलराम चौक) क) न्यु इंग्लीश ग्राऊंड

गुन्हेगारी : क्षुल्लक वाद आणि अल्पवयीन मुलाची हत्या, भाजप कार्यकर्त्याला अटक

3. वडगावआकाशवाणी व लगतच्या परीसरातून दीक्षाभुमीकडे येणा-या वाहनांकरीता : अ) लोकमान्य टिळक हायस्कुल (जिल्हा स्टेडीयमच्या मागे) ब) जिवन साफल्य गृह निर्माण सहकारी संस्था (मनोमय दवाखान्याच्या पाठीमागे)

4. मुल रोडबंगाली कॅम्पतुकुम या परीसरातून येणा-या वाहनांकरीता : अ) कृषि भवन जवळील मैदानात व टॅक्सी स्टैंड.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!