black money in politics : विधानसभा निवडणुकीत काळ्या पैश्याचा वापर…करा एक कॉल

black money in politics महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन आयकर विभागाने केले असून माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर मनपाचे उत्कृष्ट नियोजन

black money in politics निवडणुकी दरम्यान काळा पैसा वापरण्यात येत असलेली माहिती, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल या बाबत विश्वसनीय माहिती असल्यास नागरिकांनी आयकर विभागाला नक्की कळवावे. माहिती देणा-याची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असे नागपूर येथील उप आयकर निदेशक (अन्वेषण) अनिल खडसे यांनी कळविले आहे.

माहिती देण्यासाठी येथे करा संपर्क : 1. टोल फ्री क्रमांक : 1800-233-0355 /  1800-233-0356

2. व्हॉटस्ॲप क्रमांक : छायाचित्रे, व्हीडीओ इत्यादी पाठविण्यासाठी व्हॉटस्ॲप क्रमांक 9403390980

3. ई-मेल : nagpur.addldit.inv@incometax.gov.in  आणि nashik.addldit.inv@incometax.gov.in येथे संपर्क करावा.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!