चंद्रपूर – Chandrapur MHADA Fraud प्रकरणात 123 नागरिकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हाडा अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. (BLO APP मध्ये तांत्रिक बिघाड, भाजपचे निवेदन)
म्हाडाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ एजन्सीकडून १२३ नागरिकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या गंभीर प्रकरणाची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी आज गुरुवारी आपल्या जनसंपर्क कार्यालयात संबंधित नागरिक व म्हाडा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली. प्रकरणाची सखोल चौकशी करून १२३ नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे देण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीला म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय इंगोले यांच्यासह बलराम डोडाणी करण नायर, नकुल वासमवार उपस्थित होते.
Chandrapur MHADA Fraud प्रकरणाची नेमकी पार्श्वभूमी
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हाडा प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत फसवणुकीला बळी पडलेल्या १२३ नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देश दिले. अनेक वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
आमदार जोरगेवार म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात अनेक गंभीर बाबी समोर आल्या असून त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणातील शासनस्तरावरील अडचणी व धोरणात्मक प्रश्न आगामी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करून संबंधित लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले.
बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना या सर्व प्रकरणांची तपासणी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करण्याबाबतही चर्चा झाली.
यावेळी म्हाडा वसाहतीमधील विविध मूलभूत सुविधांचाही आढावा घेण्यात आला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, सार्वजनिक सुविधा आणि इतर नागरी समस्यांबाबत नागरिकांनी आपल्या मागण्या मांडल्या. या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच म्हाडात नियमित जनतादरबार आयोजित करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






