चंद्रपूरच्या रामबाग मैदानाचा विकास, रामबाग मैदान विकास

चंद्रपूरच्या ऐतिहासिक रामबाग मैदानाच्या विकासासाठी निधीची मागणी; जोरगेवारांची मुख्यमंत्र्यांकडे भेट

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 19, 2026

चंद्रपूर –   रामबाग मैदान विकास चंद्रपूरच्या ऐतिहासिक रामबाग मैदान विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील मंत्रालयात झालेल्या या भेटीत त्यांनी मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. रामबाग मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व आणि नैसर्गिक स्वरूप कायम ठेवून नागरिकांसाठी आधुनिक सुविधा निर्माण करण्याची भूमिका त्यांनी मांडली. (चंद्रपूर पोलिसांची गुन्हेगारांवर कारवाई, वाचा बातमी)

रामबाग मैदान चंद्रपूरकरांसाठी महत्त्वाचे ठिकाण, रामबाग मैदान विकास

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले आणि चंद्रपूरकरांच्या जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे ऐतिहासिक रामबाग मैदान हे शहराचे एक महत्त्वाचे खुले व नैसर्गिक ठिकाण आहे. या मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

              रामबाग मैदान हे केवळ खेळाचे मैदान नसून चंद्रपूरकरांसाठी मोकळा श्वास घेण्याचे हक्काचे ठिकाण आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मैदानाशी अनेक पिढ्यांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक, खेळाचा सराव करणारे खेळाडू, युवक तसेच परिसरातील नागरिकांसाठी हे मैदान महत्त्वाचे केंद्र बनले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली लक्षात घेता अशा मोकळ्या जागांचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.

रामबाग मैदानासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

   रामबाग मैदानाचा विकास करताना त्याचे ऐतिहासिक महत्त्व, नैसर्गिक सौंदर्य आणि मूळ स्वरूप कायम राखण्याला प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडली. मैदानाच्या परिसरात नागरिकांसाठी आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा व व्यायामासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, खेळाडूंना सरावासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच मैदान अधिक सुशोभित आणि सुव्यवस्थित करणे, या दृष्टीने विकासाचे नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी सांगितली.

            शहराच्या विकासात रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांइतकेच महत्त्व सार्वजनिक मोकळ्या जागांचेही आहे. नागरिकांना आरोग्यदायी वातावरण मिळावे, मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध व्हावी आणि पुढील पिढ्यांसाठी शहरातील नैसर्गिक ठेवा जतन व्हावा, या उद्देशाने रामबाग मैदानाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे या कामासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली.

            रामबाग मैदान हे चंद्रपूरच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या मैदानाचे मूळ सौंदर्य अबाधित ठेवत आधुनिक सुविधांनी युक्त असे स्वरूप देण्यासाठी आपण कटिबद्ध असून, चंद्रपूरकरांच्या भावनांशी जोडलेल्या या महत्त्वपूर्ण ठिकाणाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. निधी मंजूर झाल्यावर रामबाग मैदानाचा चेहरा मोहरा बदलणार अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. विकास झाल्यावर अनेक भावी अधिकारी व नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. किशोर जोरगेवार यांच्या या प्रयत्नाला असंख्य नागरिकांनी आपलं समर्थन दिल आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment