परिचारिका सीमा मेश्राम मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई होणार?

News34

 

चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कार्यरत परिचारिका सीमा मेश्राम यांचा योग्य उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही अत्यंत गंभीर बाब असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे वने , सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या संदर्भात ना. श्री. मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना पत्राद्वारे या घटनेची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

सीमा मेश्राम यांच्या उपचाराला उशीर झाला आणि त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्या अधिकारी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला आहे. त्या निष्काळजीपणासाठी दोषींवर तातडीने निलंबन करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ही ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे.

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दि.२२ ऑगस्ट रोजी या संदर्भात विस्तृत बैठक चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!