voter list revision मोहिमेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात बीएलओ नागरिकांच्या घरी जाऊन मतदार यादी पडताळणी करतानाचे प्रतीकात्मक दृश्य.

voter list revision । चंद्रपुरात घरोघरी मतदार पडताळणी; बीएलओ करणार तपासणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 15, 2026

voter list revision : चंद्रपूर – भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन – एसआयआर) कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र राज्याचाही या तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मतदारांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. (वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी आमदार मुनगंटीवार यांचा पुढाकार)

या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 2076 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत राहणार आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक कुटुंबातील मतदारांची माहिती तपासण्यात येईल. मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा दुबार नावे शोधून त्याबाबत नियमानुसार कार्यवाही केली जाईल. तसेच, पात्र असूनही मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांकडून नमुना 6 भरून घेण्यात येणार आहे. आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) कडे नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक नमुने उपलब्ध राहतील. voter list revision

voter list revision बीएलओ घरभेटीदरम्यान कोणती माहिती तपासली जाणार?

भारत निवडणूक आयोगाने या मोहिमेत राजकीय पक्षांचाही सक्रिय सहभाग अपेक्षित धरला आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी बूथ लेव्हल एजंट बीएलए) नियुक्त करण्याबाबत सर्व राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले आहे. यामुळे मतदार याद्यांतील त्रुटी दूर करणे, दुबार नावे व मृत मतदारांची नोंद कमी करणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी अधिक पारदर्शकपणे करणे शक्य होणार आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेमध्ये प्रत्येक मतदान क्षेत्रात प्रत्यक्ष घरभेटीद्वारे मतदारांची माहिती तपासण्यात येणार आहे. या मोहिमेत बीएलओ घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळतील. तसेच आवश्यक ते बदल, वगळणी व नव्याने नाव नोंदणी प्रक्रिया राबवतील. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही मतदाराकडून घरभेटीच्या वेळी कागदपत्रे संकलित केली जाणार नाहीत. तथापि, मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आवश्यकतेनुसार संबंधित मतदारांना नोटीस देण्यात येईल आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. voter list revision

तसेच, ज्या मतदारांचे इन्युमरेशन फॉर्म प्राप्त होणार नाहीत, अशा मतदारांबाबत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नाव असल्याची संभाव्य कारणे स्थानिक चौकशीद्वारे नोंदविण्यात येणार आहेत. अशा मतदारांची यादी ग्रामपंचायत, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच संबंधित कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे, जेणेकरून नागरिकांना त्याबाबत माहिती उपलब्ध होईल.

एसआयआर मोहिमेकरीता जिल्ह्यातील आकडेवारी : एकूण मतदार 18 लक्ष 68 हजार 5 असून यात पुरुष मतदारांची संख्या 9 लक्ष 44 हजार 721, स्त्री मतदार 9 लक्ष 23 हजार 234 तर तृतीयपंथी मतदार 50 आहे. 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 47864 असून 85 वर्षांवरील वयोवृध्द मतदारांची संख्या 12437 तर दिव्यांग मतदार 9 हजार आहेत.

महत्त्वाचे वेळापत्रक : 1) बीएलओ प्रशिक्षण व पूर्वतयारी 20 जून ते 29 जून, 2) घरोघरी पडताळणी मोहीम 30 जून ते 29 जुलै, 3) मसुदा मतदार यादी प्रसिद्धी 5 ऑगस्ट 2026, 4) दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर, 5) अंतिम मतदार यादी प्रसिद्धी 7 ऑक्टोबर 2026. मतदारांना मागील सखोल पुनरीक्षणातील नोंदी तपासण्यासाठी Voters’ Service Portal या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे मतदार स्वतःची माहिती तपासू शकतात. voter list revision

मतदारांना आवाहन : ‘शून्य त्रुटी’ मतदार यादी तयार करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीसाठी आल्यास नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, वसुमना पंत यांनी केले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment