बल्लारपूर / चंद्रपूर : बल्लारपूर अवैध दारू वाहतूक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका हॉटेल व्यावसायिकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून विदेशी दारूच्या बाटल्या आणि हुंडई कार जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख ९९ हजार ९८ रुपये आहे.
९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बल्लारपूरच्या जुन्या बसस्थानक चौकात ही कारवाई झाली. आरोपी चंद्रपूरचा रहिवासी असून, तो हॉटेल व्यवसायाशी संबंधित आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त दारू हॉटेलमध्ये विक्रीसाठी नेली जात होती. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बल्लारपूर अवैध दारू वाहतूक प्रकरणात पोलिसांची कारवाई
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एका हॉटेल व्यावसायिकाला रंगेहात अटक केली. बल्लारपूर शहरातील जुना बसस्थानक चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक हुंडई कार आणि विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बॉटल्ससह तब्बल ६ लाख ९९ हजार ९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाति ५ ते ६ वाजताच्या दरम्यान ही कारवाई पार पडली. (ट्र्क ची दोन वाहनांना धडक, दुचाकीस्वार ठार, वाचा बातमी)
जुना बसस्थानक चौकात हॉटेल व्यावसायिकाला अटक, बल्लारपूर अवैध दारू
जितेंद्र चंद्रकुमार तलरेजा (वय ५५, रा. सिंधी कॉलनी, रामनगर, चंद्रपूर) असे पकडण्यात आलेल्या आरोपी हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र तलरेजा हा चंद्रपूर येथील ‘वेज जंक्शन’ तसेच लोहारा परिसरातील एका हॉटेलचा संचालक आहे. तो बल्लारपूर येथून अवैधपणे विदेशी दारूचा साठा वाहनातून घेऊन जाऊन स्वतःच्या हॉटेलमध्ये विक्रीसाठी वापरत होता. प्राथमिक माहितीनुसार, त्याने ही दारू बल्लारपूर येथील जुना बसस्थानक परिसरातील सिद्धार्थ वाइन शॉपमधून खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
हुंडई कारसह ६.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त, बल्लारपूर अवैध दारू
पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत सुमारे ५ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची हुंडई कार (क्र. MH 34 AM 9944) जप्त करण्यात आली आहे. याशिवाय कारमध्ये ग्लेनवॉक व्हिस्की, रॉयल ग्रीन व्हिस्की, मॅजिक मोमेंट्स व्होडका, आयकॉनिक व्हाईट, ओकस्मिथ व्हिस्की, ब्लेंडर्स प्राईड, रेड लेबल, ऑल सीजन्स, रॉयल स्टैग, इम्पीरियल ब्लू आणि मॅकडॉवेल्ससह विविध ब्रँडच्या सीलबंद विदेशी दारूच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. या दारूची किंमत १ लाख ९९ हजार ९८ रुपये इतकी आहे.
याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अपराध शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडली. अवैध दारू तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now

