Farmer On Bullock दरम्यान बैलावर स्वार शेतकरी तहसील कार्यालयात

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी; बैलावर स्वार होत तहसील कार्यालयात पोहोचला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 23, 2026

राजुरा :- Farmer On Bullock मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका चर्चेत आला आहे. गोयेगाव येथील शेतकरी दिवाकर पहाणपटे यांनी कर्जमाफी, पाऊस, बियाणे व खतांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बैलावर स्वार होत थेट तहसील कार्यालयात प्रवेश केला. त्यांच्या या अनोख्या कृतीमुळे तहसील परिसरात मोठी चर्चा रंगली असून हे आंदोलन होते की केवळ लक्ष वेधण्याचा प्रयत्न, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. (महिलांनी स्वतःच टाकली दारू अड्ड्यावर धाड)

राज्य शासनाने जून महिन्यात कर्जमाफीची आश्वासन दिले मात्र तत्पूर्वी त्यामध्ये जाचक अटी टाकल्या, जून महिना शेवटच्या टप्प्यात आल्याने सरकारने अद्यापही कर्जमाफी जाहीर केली नाही, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात संताप निर्माण झाला आहे. या संतापामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने बैलावर स्वार होत थेट तहसील कार्यालयात कर्जमाफीच्या घोषणा लगावत फेरफटका मारला.

Farmer On Bullock मुळे तहसील कार्यालयात खळबळ

जून महिन्यात पावसाने मारलेली दांडी. शेतकरी कर्जमाफी. बी बियाणे. खतांची टंचाई ह्यासारखे विषय सध्या सर्वत्र चर्चेत असून अनेक ठिकाणी ह्याबाबत आंदोलन सुरु आहे. राजुऱ्यात देखील तालुक्यातील गोयेगाव येथील एका शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने ह्या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. राजूरा तालुक्यातील गोयेगाव येथील शेतकरी दिवाकर पहाणपटे हे आपल्या बैलावर बसून तहसील कार्यालयात दाखल झाले. (रासायनिक शेतीला रामराम, या गावाने राज्याला दाखवली दिशा)

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घोषणाबाजी करत हा शेतकरी संपूर्ण तहसील कार्यालयात फिरला. अगदी तहसील कार्यालयाच्या आता तहसीलदार चेंबर समोर हा व्यक्ती आपल्या बैलावर बसून पोहचला. तहसील कार्यालयाचा आतील पूर्ण परिसर हा व्यक्ती बैलावर बसून फिरला. माजी मंत्री हंसराज अहिर ह्याच्या समर्थनार्थ पण ह्या व्यक्तीने घोषणा दिल्या. पण आश्चर्यची बाब म्हणजे हा व्यक्ती तहसीलदार किंवा कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला भेटला नाही. किंवा कुठले निवेदन दिले नाही.

केवळ बैलावर बसून तहसील कार्यालयात फिरून हा व्यक्ती निघून गेला. त्यामुळे हे आंदोलन होते की सदर व्यक्ती विमनस्क अवस्थेत होता ह्याबाबत नागरिक चर्चा करीत आहे. कारण सदर व्यक्ती कुठल्याही एका विषयावर न बोलता सर्वच विषयावर स्वतःशीच बोलत होता. त्याने ह्याबाबत कुणाशीही चर्चा केली नाही. कुणाशी संवाद साधण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे ने नक्की आंदोलन होते की स्टन्ट बाजी होती ह्याबाबत चर्चा सुरु असली तरी ह्या अनोख्या प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले हे नक्की.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment