KPCL Baranj Coal Mine illegal mining complaint by Hansraj Ahir to Forest Minister Ganesh Naik

चंद्रपुरातील KPCL बरांज कोळसा खाणीतून सव्वा लाख टन अवैध उत्खनन; हंसराज अहीर यांची वनमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 2, 2026

चंद्रपूर :- KPCL Baranj Coal Mine चंद्रपूर जिल्ह्यातील बरांज कोळसा खाणीतून तब्बल १ लाख ३० हजार मेट्रिक टन कोळशाचे अवैध उत्खनन झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मंत्रालयात महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत वनजमिनीवरील बेकायदेशीर उत्खननाचे शासकीय पुरावे वनमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत कंपनीवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. (हे हि वाचा – विषबाधा प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करा – मनविसेची मागणी)

केपीसीएलच्या बरांज कोळसा खाणीशी निगडीत प्रश्न व वनविभागाशी संबंधित अन्य महत्वपूर्ण विषयाला घेऊन पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 01 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

KPCL Baranj Coal Mine : ८४ हेक्टर वनजमिनीतून सव्वा लाख टन कोळशाचे अवैध उत्खनन

            या भेटीप्रसंगी कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (KPCL) च्या बरांज कोळसा खाणीद्वारे वनविभागाच्या मालकीतील 84.41 हेक्टर वनभूमीतून अंदाजे 1 लाख 30 हजार मे. टन कोळशाचे अवैधरित्या उत्खनन करण्यात आल्याची गंभीर बाब हंसराज अहीर यांनी वनमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली. हे उत्खनन अटी व शर्तींचा भंग करून झाले असल्याचे कागदोपत्री पुरावे, विविध शासकीय पंचनामे तसेच वन अधिकाऱ्यांच्या अहवालातून उघडकीस आले असल्याचे सुध्दा अहीर यांनी यावेळी वनमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत निदर्शनास आणले.

वन संवर्धन कायदा १९८० आणि भारतीय वन कायद्याचे उघड उल्लंघन

            वनभुमीतील कोळशाचे उत्खनन बेकायदेशीर असून या प्रकरणात वन संवर्धन कायदा, 1980 तसेच भारतीय वन कायदा, 1927 च्या कायद्याचे उल्लंघन असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच संबंधित कंपनीने स्थानिक नागरिकांच्या निस्तार हक्कांवरही गदा आणली असल्याने केपीसीएल कंपनीविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई केली जावी, अशी मागणी अहीर यांनी वनमंत्र्यांना केली.

            सदर गंभीर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जाईल व उच्चस्तरीय चौकशी अहवालाच्या आधारे दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. याविषयी कसलीही हयगय केली जाणार नाही, असे आश्वासन वनमंत्री नाईक यांनी हंसराज अहीर यांना याप्रसंगी दिले.

            या भेटीत चारा बँकेच्या संकल्पनेबाबतही सविस्तर चर्चा झाली. जंगलातील वाया जाणारे गवत पशुधन तसेच गौमातेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी चारा बँकेचा उपक्रम उपयुक्त असल्याची सकारात्मक भुमिका व्यक्त करून श्री. नाईक यांनी याविषयी मंत्रालयाद्वारे गंभीरपणे विचार केला जाईल याबाबतही अहीर यांना आश्वस्त केले. या भेटीत वनसंवर्धन, स्थानिक नागरिकांचे प्रश्न व अन्य समस्या, पशुधनासाठी वनविभागाच्या अख्त्यारितील जमिनीवर चाऱ्याची उपलब्धता यासंबंधात सुध्दा सकारात्मक चर्चा झाली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment