चंद्रपूर – राज्यात आज विविध ठिकाणी एटीएसच्या पथकाने विविध जिल्ह्यात धाडसत्र सुरु केले, यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात एका संशयित युवकाला एटीएस च्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
पाकिस्तानातील पाकिस्तानी गँगस्टर शाहजाद भट्टी गँग आणि डोगर गँगशी संबंधित किंवा त्यांना फॉलो करणाऱ्या व्यक्तीबाबत नागपूरच्या एटीएस पथकाने चौकशी केली. गोंडपिपरी मध्ये सकाळी एटीएस चे पथक दाखल झाले, गोंडपिपरी मध्ये राहणाऱ्या युवकाची यावेळी चौकशी करण्यात आली.
सदर युवक हा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील निवासी असून तो गोडपिपरी मध्ये शिक्षणासाठी राहत होता, सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी हा गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात आहे का याची करण्यात कसून चौकशी करण्यात आली. मात्र एटीएस ला या विद्यार्थ्याबाबत कुठलीच संशयास्पद माहिती न मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांची चौकशी करून त्याला सोडण्यात आल्याची चंद्रपूर पोलिसांनी माहिती दिली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
