Chandrapur house burglary news : चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरांनी चांगलाच धुडगूस माजविला असून इंदिरा नगर भागात २ ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून लाखोंच्या मुद्देमालावर अज्ञात चोरांनी हात साफ केला. (मुलीवर वशीकरणाचे आमिष देत २२ वर्षीय युवकाची हत्या)
पहिल्या घटनेत २४ जानेवारीला इंदिरानगर पंचशील चौकात राहणारे मंगेश तिरकुडे हे कुटुंबासह नागपूरला गेले, जाण्यापूर्वी त्यांनी घराला कुलूप लावले होते, २८ जानेवारीला कार्यक्रम आटोपून तिरकुडे चंद्रपुरात परतले व दाताला मध्ये ते सासऱ्याच्या घरी थांबले, दुसऱ्या दिवशी २९ जानेवारीला सायंकाळी ते आपल्या घरी आले असता त्यावेळी घराचे मुख्य दाराचे लॉक तुटलेल्या अवस्थेत होते.
बेडरूम मधील लोखंडी आलमारी तुटलेल्या अवस्थेत होती, लॉकर मधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लक्ष ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञातांनी लांबविला, दुसऱ्या घटनेत त्याच भागात राहणारे तिरकुडे यांचे शेजारी श्याम पुंडे यांच्या घरी सुद्धा अज्ञाताने चोरी करीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम २२ हजारांचा माल चोरून नेला. घटनेच्या दिवशी श्याम पुंडे हे कुटुंबासह गोंदियाला गेले होते.
या दोन्ही घरफोडीच्या घटनेत चोरटयांनी १ लक्ष ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला, रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाल्यावर पोलिसांचे श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले होते, पोलिसांनी परिसरात पाहणी करीत सीसीटीव्ही तपासले. इंदिरानगर भागात मध्यरात्री नंतर अज्ञात इसमाचा मोठ्या प्रमाणात वावर वाढतो. या भागात पोलिसांची गस्त हि नावापुरती असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
Leave a Comment