Friday, April 19, 2024
Home Blog

Chandrapur Loksabha Election Day : चंद्रपूर लोकसभेची निवडणूक, मतदार यादीतून नाव गहाळ आणि गोंधळ

0

Chandrapur Loksabha Election Day चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता सकाळी 7 ते दुपारी 5 या वेळेत 55.11 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात राजूरा 59.14 टक्के, चंद्रपूर 48.20 टक्के, बल्लारपूर 59.06 टक्के, वरोरा 57.56 टक्के, वणी 58.87 टक्के, आर्णि विधानसभा मतदारसंघात 49.70 टक्के मतदान झाले.

हे ही वाचा – चंद्रपुरातील सामान्य नेता

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. यापैकी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 5 लक्ष 26 हजार 229 पुरुष मतदारांनी (55.64 टक्के), 4 लक्ष 86 हजार 708 स्त्री मतदारांनी (54.56 टक्के) तर पाच इतर नागरिकांनी (10.42 टक्के) असे 10 लक्ष 12 हजार 942 (55.11 टक्के) मतदारांनी मतदान केले. Chandrapur Loksabha Election Day

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजतापासूनच मतदारांनी हजेरी लावली होती. ठिक-ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा दिसल्या. दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. Chandrapur Loksabha Election Day

 

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाजेपर्यंत 55.11 टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रांवर महिला व युवा मतदारांची गर्दी दिसून आली. तसेच पहिल्यांदाच मतदान करणा-यांमध्ये उत्साह निदर्शनास आला. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघात महिला व्यवस्थापन मतदान केंद्र, दिव्यांग व्यवस्थापन मतदान केंद्र, युवा कर्मचारी व्यवस्थापन मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते.

 

जिल्हाधिकारीही मतदानासाठी रांगेत : जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सहपरिवार येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सकाळी मतदानाचा हक्क बजावला. सुरवातीला मतदान केंद्राची पाहणी केल्यानंतर मतदान करण्यासाठी ते स्वत: रांगेत उभे राहिले. Chandrapur Loksabha Election Day

 

18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रशासनाचे ढिसाळ नियोजन चर्चेत राहिले

यामध्ये सर्वात मोठी अडचण ही मतदारांची झाली, मतदान केंद्रावर पोहचल्यावर अनेक मतदारांची नाव यादीत नसल्याने संभ्रम वाढला, काही मतदार ह्यात असताना त्या मृत दाखविण्यात आल्या तर काहींच्या नावा समोर डिलीट शब्दाचा उल्लेख होता, शहरातील बगड खिडकी येथील प्रियदर्शिनी शाळेत काहींनी बोगस मतदान केलं असल्याचा आरोप नागरिकांनी लावला, या बुथवर तब्बल 250 नागरिकांची नावे गहाळ झाली होती, नागरिकांनी आक्षेप घेतल्यावर त्या बुथवर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. नागरिकांतर्फ कादर शेख यांनी प्रशासनासमोर आपली बाजू मांडली.

 

बाबूपेठ, ज्युबिली शाळेतील ईव्हीएम मशीन काही काळ बंद राहिल्याने त्याठिकाणी 1 ते 2 तास मतदान उशिरा सुरू झाले. Chandrapur Loksabha Election Day

 

लोकसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार मिलिंद दहिवले यांच्या आईचे नाव यादीतून गहाळ झाले त्यावेळी दहिवले यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा त्यांच्याकडे दाद मागितली मात्र त्यांनी असमर्थता दर्शविली.

 

चंद्रपूर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना भर उन्हात मतदान केंद्रावर वोलेंटियर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, सकाळी 7 वाजेपासून विद्यार्थी दिव्यांग व 80 वय वर्षे नागरिकांना मतदान करण्यासाठी घेऊन जात होते, प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ असल्याने विद्यार्थ्यांना भर उन्हात प्रशासनाने नाहक त्रास दिला, काही ठिकाणी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण सुद्धा मिळाले नाही.

मतदानाच्या दिवशी सकाळी वरोरा येथील लोकमान्य टिळक शाळेतील मतदान केंद्रावर महाविकास आघाडी उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सकाळीच मतदान केले, त्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी मतदानाचा हक्क बजावला, दुपारी 12 वाजेनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापाठोपाठ राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, चंद्रपूर चे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला.

General Leader Kishor Jorgewar : चंद्रपुरातील नेत्यामधील सामान्य माणूस

0
General leader

General Leader Kishor Jorgewar लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजता पासून सुरवात झाली. यावेळी सकाळ पासूनच आमदार किशोर जोरगेवार फिल्डवर दिसून आले. यावेळी ते एखाद्या सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे फुटपाथवरील नाश्ता दुकानात नाश्ता करत असल्याचा फोटो समाज माध्यमांवर वायरल झाला आहे. त्यामुळे नेत्यामधील सामान्य माणूस असेच काहीसे यातून दिसत आहे.

 

आज मतदानाचा दिवस आहे. त्यामुळे मागील काही दिवसात उम्मेदवारांनी केलेल्या प्रचाराचे आज मतात रुपांतरण करण्याचे मोठे आवाहन उमेदवारांपुढे आहे. त्यामुळे सकाळ पासूनच सर्व राजकीय पक्षांचे नेते पधाधिकारी फिल्डवर दिसून येत असून मतदानासाठी येणाऱ्या मतदात्यांशी संवाद साधत आहे. General Leader Kishor Jorgewar

 

यात चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे सुध्दा मागे नाही. आज सकाळी पटेल हायस्कूल या बुथवर मतदान करून ते ही विविध बुथवर भेटी देतांना दिसून येत आहे. General Leader Kishor Jorgewar

 

निवडणुकीच्या या रणधुमाळीत कमी वेळात अधिक ठिकाणी जाण्यासाठी मोठी दमछाक होत असते.
दरम्यान बंगाली कँम्प येथील एका टपरीवर चहा नाश्ता करत असताना फोटो वायरल होत आहे. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे ते नागरिकांमध्ये बसून नाश्ता करताना पाहून तेथील नागरिकांना सुखद धक्का बसला. सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ती या प्रसंगामुळे पुन्हा एकदा दिसून आली.

Chandrapur Politicians in One Frame : चंद्रपूरच्या राजकारणातील दिग्गज एका फ्रेममध्ये

0
Chandrapur news

Chandrapur Politicians in One Frame चंद्रपूर लोकसभा निवडणूकीचा प्रचार थंडावल्या नंतर सर्व कार्यकर्ते गुप्त प्रचारात व्यस्त झाले आहे.महत्वाचे म्हणजे चंद्रपुरातील ना सुधीर मुनगंटीवार,राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व आमदार किशोर जोरगेवार एकत्र आल्याने या विषयाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.बुधवारी झालेल्या यंग चांदा ब्रिगेडच्या सभेत आ.जोरगेवार यांनी ना.मुनगंटीवार यांना गुरूची उपमा देत,त्यांना विजयी करण्याचा संकल्प केल्याने गुरूला मिळाली शिष्याची साथ अशी चर्चा आहे.यातच रामनवमीच्या शोभायात्रेत हंसराज अहिर यांनी हजेरी लावून तिघांनी रामभक्तांचे अभिनंदन केल्याने नको त्या चर्चांना विराम मिळाला.

ही बातमी अवश्य वाचा – सुधीर मुनगंटीवार झाले भावूक

वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा दिला आहे. Chandrapur Politicians in One Frame

राजकीय बातमी – ठाकरे गटाचे कट्टर झाले मोदी प्रेमी

यात महिला पतंजलि योग समिती महाराष्ट्र, पालेवार भोई समाज चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा साऊन्ड सिस्टम असोशिएशन चंद्रपूर, राष्ट्रीय हिन्दू महासभा (भारत), राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस 95 चंद्रपूर जिल्हा, सोनार समाज चंद्रपूर जिल्हा, विश्वब्राम्हण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर,तेलगू शिंपी समाज,फार्मर प्रोड्युसर कम्पनी,राजपूत समाज,बीआरएस,जनआक्रोश संघटना, यंग चांदा ब्रिगेड,धनोजे कुणबी समाज संघटना, धनगर समाज,खेडुले कुणबी समाज,भोई समाज,हिंदी भाषिक ब्राह्मण समाज,चंद्रपूर गडचिरोली ब्राह्मण सभा,जिल्हा मच्छिमार संघ,यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला आहे. Chandrapur Politicians in One Frame

 

सुधीर मुनगंटीवार सारखा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत.

Sudhir Mungantiwar Chandrapur : सुधीर मुनगंटीवार झाले भावूक

0
Bjp chandrapur

Sudhir Mungantiwar Chandrapur चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांचे यवतमाळ जिल्ह्यातील त्‍यांच्‍या आजोळी म्‍हणजेच बोरगावात दमदार स्‍वागत झाले.

गावात प्रवेश करताच बंजारा समाजातील बांधवांनी पारंपरिक डफली वादन करून व भगिनींनी त्‍यांचे औक्षण करून स्‍वागत केले. यावेळी जोरदार फटाक्‍यांची आतषबाजी करण्‍यात आली. नागरिकांच्‍या या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादाने ना. मुनगंटीवार काही क्षण भावूक झाले. मला आज माझ्या आजोळी प्रचार करण्‍याची संधी मिळाली, त्‍यासाठी मी स्‍वत:ला खूप भाग्‍यवान समजतो, असे ना. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. Sudhir Mungantiwar Chandrapur

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव हे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मातोश्री चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे माहेर आहे.

 

लहानपणी शाळेला सुट्ट्या लागल्‍या की ते उन्हाळ्यात महिनाभरासाठी आजोळी मुक्कामाला येत असत. गावचा नातू ते राज्याचा कॅबिनेट मंत्री असा भन्नाट प्रवास केलेल्‍या ना. सुधीर मुनगंटीवार यांची आजोळबद्दलची ओढ जाहीर सभेच्‍या निमित्‍ताने परत एकदा बोरगाववासियांनी अनुभवायला मिळाली. Sudhir Mungantiwar Chandrapur

 

यावेळी झालेल्‍या जाहीर सभेत त्‍यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्‍हणाले, लहानपणी येथील बंजारा समाजातील माता-भगिनींनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. गावक-यांचे माझ्यावर मोठे ऋण असून ते मला येथील लोकांचा विकास साधून फेडायचे आहे. भरघोस मतदान करून तुम्‍ही ती संधी द्याल, असा विश्‍वास आहे, असे ते म्‍हणाले.

Jai Maharashtra to Shiv Sena : चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का

0
Shivsena chandrapur

Jai Maharashtra to Shiv Sena मनोज सुकुमार पाल यांनी 1995 ला महाविद्यालयीन विद्यार्थी असताना हिंदूहृदयसंघाट आदरनिय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारने प्रभावित होऊन वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला. वरिष्ठ पदाधिका-यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिक महणून कार्याला सुरुवात केली. पुढे विद्यार्थी सेनेच्या शाखा संघटक ते जिल्हा संघटक 2005 पासून 2016 पर्यंत पदावर कार्यरत असताना अनेक आंदोलने करत सामान्य विद्यार्वांना न्याय मिळवून देत असताना स्वतः वर विविध 21 फौजदारी गुन्हे अंगावर घेत जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये निवडनुका जिंकून भगवामय वातावरण विद्यार्थीवर्गात निर्माण करण्यात यशस्वी कामगिरी त्यांनी केली.

हे ही वाचा – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात गुप्त प्रचार सुरू

2019 साली शिवसेनेन्या जिल्ह्यातील मुख्य कार्यकारणीत चंद्रपूर शहर (महानगर) प्रमुख्य पदि कार्य करण्याची संधी मिळाली. मी पक्षाचे ध्येयधोरण समावत पक्षात आपले त्यालोकांना पदाधिकारी बनवत अनेक वर्षापासून चंद्रपूर शहरातील कार्यालय व सर्व शाखा आम्ही सुरु ठेवून सामन्य शिवसैनिकाने कार्य सुरु ठेवले होते. मात्र 27 फेब्रुवारी 2024 ला व्यक्तिगत कारण्यास्तव पक्षाच्या (उबाठा) शिवसेना गटाचा स्वेच्छिक राजिनामा त्यांनी पक्षश्रेष्ठी कडे मुंबई येथे जाऊन सोपवीला होता. Jai Maharashtra to Shiv Sena

ही बातमी अवश्य वाचा : चंद्रपुरात 2 वारांचे मनोमिलन

त्यानंतर आज लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेऊन त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.

 

लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यावर काँग्रेस च्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः त्यांच्या कार्यलयात भेट देऊन मदतीचा हाथ मागितला होता मात्र मनोज पाल यांचेशी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संपर्कात होते व आज अचानक पाल यांनी बल्लारपूर येथील कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्ष प्रवेश घेतला. Jai Maharashtra to Shiv Sena

 

मनोज पाल यांच्या भाजप प्रवेशाने शिवसेनेने 30वर्ष अनुभवी पक्ष संघटक गमावला असून त्यांच्या सर्वपक्षीय संबंध – संपर्काचा फायदा भाजप ला होईल.शिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील बंगाली समाजावर त्यांची चांगली पकड असून याचा निश्चित फायदा लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांना तर् होईलच शिवाय भविष्यात येणाऱ्या विधानसभा-महानगर पालिका निवडणुकीतही महत्वाची भूमिका राहील असे राजकीय मत आहे.

Lok Sabha election first phase : प्रचारतोफ थंडावली, आता सोशल मीडिया व गुप्त प्रचारावर भर

0
First phase loksabha election

Lok Sabha election first phase पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा 17 एप्रिलला सायंकाळी 6 वाजतापासून थंडावल्या, आजपासून गुप्त प्रचाराला सुरुवात झाली मात्र त्यापूर्वी समाजमाध्यमावर भाजप व कांग्रेस समर्थक एकमेकांपुढे उभे ठाकले आहे.

हे ही वाचा : चंद्रपुरातील राजकीय कट्टर विरोधक आले एकत्र

महायुती तर्फे सुधीर मुनगंटीवार तर महाविकास आघाडी तर्फे प्रतिभा धानोरकर या निवडणुकीच्या मैदानात आहे, आधी सोपी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या दिवशी अटीतटीची झाली, सुधीर मुनगंटीवार यांनी विविध पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला, मात्र कांग्रेस पक्षात बोटं मोजण्याइतकेच दुसऱ्या पक्षातील नेते दाखल झाले, यासाठी कांग्रेस पक्षाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत ठरले. Lok Sabha election first phase

 

एकीकडे भाजपकडून पंतप्रधान मोदी सहित अनेक नेते व मंत्री, आणि अभिनेते मुनगंटीवार यांच्या प्रचाराला आले, मात्र कांग्रेस पक्षातील प्रचाराला विरोधी पक्ष नेत्याने निव्वळ एकच सभा घेतली, सुभाष धोटे यांनी प्रियांका गांधी यांची सभा मैदान न मिळाल्याने रद्द करावी लागली असे सांगितले मात्र चंद्रपुरात असे अनेक मैदान आहे जिथे कांग्रेस त्यांची सभा घेऊ शकले असते मात्र तसे काही झाले नाही. Lok Sabha election first phase

ही बातमी अवश्य वाचा – अम्मा ने दिला निराधारांना आधार, अम्मा की दुकान सुरू

कांग्रेस पक्षाला समाजमाध्यमाचा वापर करावा लागला, विशेष म्हणजे भाजप व कांग्रेस दोन्ही पक्षांनी समाजमाध्यमावर प्रचारात आघाडी घेतली, कांग्रेस पक्षाला ढिसाळ नियोजनाचा फटका बसला, घटकपक्ष नाराज झाले, अनेकांनी कांग्रेस पक्षाच्या सभेत जाणे टाळले, याचा लाभ सध्या भाजप पक्षाला होत आहे.

 

एकीकडे 30 ते 35 वर्षाचा राजकारण व मंत्रिमंडळाचा अनुभव असलेले नेते सुधिर मुनगंटीवार तर दुसरीकडे राजकारनात फक्त साडेचार वर्षाचा अनुभव असलेल्या प्रतिभा धानोरकर यांची लढत आता सोशल मीडियावर रंगली आहे, “ताई तुम्ही 4 वर्षे काय विकास केला याबद्दल सांगा” असे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांच्या सभेतील मुनगंटीवार यांचा जाहिरसभेतील कांग्रेस आणीबाणीच्या वेळी झालेल्या अत्याचाराबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल होत आहे. Lok Sabha election first phase

 

आता सर्व धुरा समाज माध्यमाकडे लागली आहे, मुनगंटीवार म्हणतात की मी राजकारण हे देशीचे करीत नाही तर देशासाठी करतो मात्र 17 एप्रिलला भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या मेव्हणा दारूची तस्करी करताना पोलिसांना आढळला, म्हणजेच आता भाजपचे लोक देशीचे राजकारण करू लागले आहे.

 

दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी काही सोशल मीडिया इन्फ्लुन्सर कामाला लागले होते, त्यांनी आपल्या उमेदवारांच्या बाबतीत चांगलं बोलणार्याचे व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर टाकले, काही पण होऊ द्या ।तर इन्फ्लुन्सर ना याबाबत रोजगार मिळाला.

 

ग्रामीण भागात कांग्रेस तर शहरी भागात भाजप अशी स्थिती निर्माण झाली, मात्र या 2 दिवसात संपूर्ण राजकारण बिघडू शकते याची शक्यता आहे, आता साम दाम दंड भेद अशी लढाई निवडणुकीत दिसत आहे.

 

3 दिवस दारूचे दुकान बंद आहे पण कार्यकर्त्यांना दारू उपलब्ध होणारचं, पोलीस यंत्रणा यावर निगा कशी राखणार हे त्यांच्यासमोर एक आवाहन असणार आहे.

Big political Upheaval in Chandrapur : चंद्रपुरात मोठी राजकीय उलथापालथ, 2 वारांचे झाले मनोमिलन

0
Chandrapur lok sabha

Big political upheaval in Chandrapur चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आजपासून थंडावल्या असून पुढील मतदानापूर्वीचे दोन दिवस गुप्त प्रचार सुरू होणार, मात्र त्यापूर्वी चंद्रपुरातील राजकीय क्षेत्रात मोठी घडामोड बघायला मिळाली.

 

17 एप्रिलला चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडचा भव्य मेळावा घेत महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा दिला.

 

चंद्रपूरच्या राजकारणात जोरगेवार व मुनगंटीवार एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. Big political upheaval in Chandrapur

 

पूर्वी किशोर जोरगेवार हे भाजप पक्षात सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काम करायचे, मात्र वर्ष 2014 च्या निवडणूक दरम्यान जोरगेवार यांना विधानसभेची तिकीट न मिळाल्याने जोरगेवार शिवसेनेत दाखल झाले, त्यांनी निवडणूक लढवली मात्र त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला, मात्र 2019 ला शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेड नामक संघटना स्थापन करीत अपक्ष निवडणूक लढवली, या निवडणुकीत जोरगेवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. Big political upheaval in Chandrapur

 

त्यानंतर मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार असा सामना चंद्रपुरात रंगला, शहरातील अनेक कार्यक्रमात भर मंचावर दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे सुरू केले होते.

 

महाविकास आघाडी सरकारला अपक्ष आमदार जोरगेवार यांनी पाठिंबा दिला, त्यानंतर राज्यात महायुती सरकारला सुद्धा जोरगेवार यांनी पाठिंबा दिला, मात्र लोकसभा निवडणुकीत उभे असलेले महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार राजकीय विरोधक त्यांना पाठिंबा द्यायचा तरी कसा? असा यक्ष प्रश्न अपक्ष आमदार जोरगेवार यांच्यापुढे उभा राहिला मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यस्थी केल्यावर अखेर जोरगेवार यांना मनोमिलन करावे लागले. Big political upheaval in Chandrapur

 

आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात किशोर जोरगेवार यांनी सुधीर मुनगंटीवार हे माझे राजकीय गुरू आहे, आज आम्ही एकत्र आले असून मी त्यांना गुरुदक्षिणा देत आहोत.

 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की अपक्ष आमदारांच्या समर्थनाने मला ताकद मिळाली आहे, याचा फायदा लोकसभा सहित चंद्रपूर विधानसभेत होणार.

Chandrapur Ram Navami Shobha Yatra : चंद्रपुरात आज रामनवमी निमित्त निघणार भव्य शोभायात्रा

0
Shree ram janmotsav

Chandrapur Ram Navami Shobha yatra चंद्रपूर शहरात मागील 82 वर्षापासून सुरू असलेल्या श्री रामनवमी शोभयात्रेच्या परंपरेनुसार 17 एप्रिलला शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

याबाबत श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीने 13 एप्रिलला पत्रकार परिषदेत माहिती दिली.

हे ही वाचा – चंद्रपुरात आता निराधारांच्या मदतीला धावली अम्मा, चंद्रपुरात अम्मा की दुकान

यंदाच्या शोभायात्रेत शहरातील मुख्य रस्त्यावर 111 प्रवेशद्वार, विविध देखावे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. Chandrapur Ram Navami Shobha yatra

 

गुढीपाडवा ते श्रीराम नवमी पर्यंत सलग 9 दिवस विविध संस्था व समाजाच्या माध्यमातून सर्व देवस्थान व चौकामध्ये सुंदरकांड पाठ, रामलला जन्मस्थान मंदिर, विभिन्न धार्मिक दृश्याने चंद्रपूर नगरी सजविण्यात येणार आहे. अशी माहिती समितीचे शैलेश बागला यांनी दिली.

Indian Olympic Association President : देशाची उडणपरी म्हणते चंद्रपूरमधून लोकसभेत यांना जायला हवं

0
Chandrapur pt usha

Indian Olympic Association President चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहचली असून 17 एप्रिलला प्रचार तोफा थंडावणार आहे, त्यापूर्वी भाजप पक्ष आपल्या पक्षातील दिग्गजांना निवडणुकीच्या मैदानात उतरवीत आहे.

 

चंद्रपुरात आज भारतीय ऑलम्पिक संघाच्या अध्यक्षा व राज्यसभा खासदार पिटी उषा यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. Indian Olympic Association President

 

ऑलम्पिक स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी पिटी उषा यांची पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आधी पत्रकारांना देण्यात आली मात्र पिटी उषा यांनी पत्रकार परिषदेत आल्यावर चंद्रपुरात विकासात्मक कामाचे कौतूक केले, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे ऑलम्पिक स्पर्धेसाठी असलेली रनिंग ट्रॅक चंद्रपुरात तयार करण्यात आली आहे त्याचे सुद्धा तोंड भरून कौतुक करण्यात आले, चंद्रपुरात होत असलेला विकास याला बघत आपण सर्वांनी सुधीर मुनगंटीवार यांना मतदान करावे असे आवाहन केले.

 

प्रचाराबाबत माहिती पुढे आल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले की आम्हाला ऑलम्पिक स्पर्धेबाबत माहिती देणार यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली मात्र आपण प्रचारात्मक कसे काय बोलू शकता? कारण आपण संवैधानिक पदावर सध्या विराजमान आहे, ते पद आपल्याकडे असल्याने प्रचार आपण करू शकत नाही. Indian Olympic Association President

 

त्यांनतर पिटी उषा हडबडल्या आणि त्यांनी आपली ट्रॅक सोडली, व चंद्रपुरात असलेल्या सैनिक स्कुल चा विकास व विसापूर येथील क्रीडा संकुलाचे कौतुक करीत आमच्या वेळेस अशी व्यवस्था नव्हती मात्र आज देश प्रगतीपथावर आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडूंना आपले कलागुण बाहेर दाखविण्यास संधी मिळत आहे. Indian Olympic Association President

 

महिला पैलवान यांच्यावर लैंगिक अत्याचार झाला त्यावर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या वर कारवाई करण्यात आली नाही? जे झालं ते योग्य होत का? असा प्रश्न पिटी उषा यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या आता तशी परिस्थिती देशात नाही, सध्या प्रत्येक खेळातील स्पर्धक आनंदित आहे, ज्या खेळाडूंनी आरोप केला ते आता ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे.

एकंदरीत देशात “उडणपरी” म्हणून नावलौकिक असणाऱ्या पिटी उषाने लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात आपला “ट्रॅक” सोडला.

Amma Ki Dukan : चंद्रपुरात अम्मा की दुकानाची सुरुवात

0
Chandrapur news

Amma Ki Dukan Chandrapur निराधार गरजु महिलांना स्वयंरोजगारातुन आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्व. प्रभाताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून अम्मा की दुकान हा उपक्रम राबविल्या जात आहे. सदर उपक्रमाअंतर्गत बंगाली कॅम्प येथील मालती देवनाथ या निराधार महिलेला अम्मा का दुकान उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

 

सदर दुकानाचे गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहर प्रमख कौसर खान, आशा देशमूख, विमल कातकर, शमा काजी, निलिमा वनकर, अनिता झाडे आदिंची उपस्थिती होती. Amma Ki Dukan Chandrapur

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहे. त्यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या अम्मा का टिफिन हा उपक्रम राज्यभर चर्चीला जात आहे. सदर उपक्रमा अंतर्गत गरजवंताच्या घरी दररोज जेवणाचा टिफिन पोहचविला जात आहे. दरम्यान आता त्यांच्या संकल्पनेतून स्व. प्रभाताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अम्मा कि दुकान हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. Amma Ki Dukan Chandrapur

 

सदर उपक्रमा अंतर्गत मतदार संघातील दोन दिव्यांग बांधवांना दुकान उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर आज शहरातील बंगाली कँम्प येथील मालती देवनाथ या निराधार महिलेला दुकान उपलब्ध करुन देण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा यांनी या दुकानाचे उद्घाटन केले. Amma Ki Dukan Chandrapur

 

अम्मा स्वतः फुटपाथवर बसुन टोपल्या विकते त्यामुळे फूटपाथवर दूकान लावतांना येणा-या अडचणींची तिला जाण आहे. त्यामुळे आपण सदर उपक्रम सुरु केला असल्याचे अम्मा यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना आणि शहरी भागात निराधार गरजु महिलांना सदर दुकान देणार असल्याचेही अम्मा यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!