DJ equipment theft case : सिंदेवाही - आजकाल चोरीसाठी रोख, सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्याव्यतिरिक्त इतर साहित्य चोरण्यास चोर आपली प्राथमिकता दाखवीत आहे, अश्याच एका प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व सिंदेवाही पोलिसांच्या संयुक्त कारवाई डीजे साहित्य चोरी करणाऱ्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
४ महिन्याच्या आयुषला आहे १६ कोटी रुपयांच्या इंजेक्शनची गरज
पोलीस स्टेशन सिंदेवाही मध्ये चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरु होता, या गुन्ह्यात डीजे चे साहित्य असा एकूण १ लक्ष ५० हजारांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला होता. सिंदेवाही पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते.
सदर प्रकरणाचा व आरोपींचा शोधात असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा व सिंदेवाही पोलिसांच्या संयुक्त शोधमोहिमेला यश प्राप्त होत, या प्रकरणातील आरोपी सिंदेवाही येथील २८ वर्षीय शुभम नागोसे व इतर ४ जणांना अटक करण्यात आली. गुन्ह्यात चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल व व गुन्ह्यात वापरलेले वाहन यावेळी जप्त करण्यात आले. police catch 5 thieves with DJ items
Powered by myUpchar
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व सिंदेवाही पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सागर महल्ले, पोउपनि प्रेमनाथ ठवकर, पोलीस कर्मचारी जयंत चुनारकर, नितेश महात्मे, गणेश भोयर, प्रदीप मडावी व दिनेश अराडे यांनी केली.
Leave a Comment