News 34 impact । News 34 चा दणका! बातमीनंतर गडचांदूर पोलिसांची धडक कारवाई

January 17, 2026 by Prakash Hande

News 34 impact

News 34 impact : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सट्टा पट्टी जुगारावर गडचांदूर पोलिसांनी कारवाई केली. याबाबत News34 ने दोनदा सट्टापट्टी व जुगार खेळताना फोटो सहित बातमी प्रकाशित केली होती. Gadchandur satta patti gambling raid


2 मे रोजी लक्ष्मी टॉकीज परिसरात जुगार व सट्टा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती गडचांदूर पोलिसांना मिळाली होती. लक्ष्मी टॉकीज जवळ काही इसम हे एकाला पैसे देत सट्टापट्टी जुगार खेळताना आढळली.
पोलिसांनी सापळा रचून एकाला पकडले, पोलिसांनी चौकशी केली असता सदर इसमाने आपले नाव 35 वर्षीय सचिन रामकिशन चितकुंटलवार राहणार गडचांदूर कोरपना असे सांगितले.
पोलिसांनी चितकुंटलवार ची अंगझडती घेतली असता 800 रुपये रोख व सट्टापट्टीचे आकडे लिहलेल्या चिठया आढळल्या. News34 report on Gadchandur gambling

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने केली १३ नागरिकांची शिकार


पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सूरज ढोले यांनी केली.


बातम्या प्रकाशित
गडचांदूर शहर हे औद्योगिक शहर असल्याने याठिकाणी बाहेरील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी येतो, या मजूर वर्गाचे आर्थिक शोषण करीत बेकायदेशीर रित्या सट्टापट्टी चालविल्या जात असल्याची व त्यामागील सूत्रधार कोण अशी बातमी News34 ने प्रकाशित केली. उशिरा का होईना पण पोलिसांना अखेर जाग आली. येणाऱ्या काळात लक्ष्मी टॉकीज परिसरात किंवा इतर भागात असले धंदे सुरू झाले तर त्याबाबत सुद्धा बेधडकपणे बातमी प्रकाशित करण्यात येणार.

Leave a Comment

+