शेत-पाणंद रस्ते योजना यशस्वी करा - आ. किशोर जोरगेवार

January 23, 2026 by Prakash Hande

Panand Rural Roads : चंद्रपूर - चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ पाणंद रस्त्यांनी युक्त करण्याचा आपला ठाम संकल्प असून मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी पायाभूत सुविधा सक्षम केल्या जाणार आहेत. मात्र या योजनेचा खरा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागांमध्ये समन्वय साधत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. (चंद्रपूर महापौर - बहुमताचा खेळ सुरु)

             मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात शुक्रवारी उपविभागीय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामउपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुलेतहसिलदार विजय पवारनायब तहसीलदार राजु धांडेगट विकास अधिकारी संगीता भांगडेवन परिक्षेत्र अधिकारी जि. आर नायगमकरएस. व्ही मव्हेशंकरउपकृषी अधिकारी व्ही. बी बुग्गेवारमहसुल अधिकारी व्ही.एम कुरेवारके. टी मोडकवारप्रविणकुमार वर्भेविनोद गणफाडेप्रकाश सुर्वेभुकरमापक व्हि.डी राठोडतलाठीएस. एन दुर्गेएस. आर नगराळेसार्वजनिक बांधकाम विभागाचे के. एस आश्रामयांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कीशेतकर्यांना थेट शेतापर्यंत पोहोचता यावेशेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावायासाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे केवळ कागदावर नव्हेतर प्रत्यक्षात दर्जेदार आणि उपयोगी रस्ते तयार झाले पाहिजेतयाकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. Panand Rural Roads

 यावेळी आमदार जोरगेवार यांनी विविध विभागांना ठोस सूचना दिल्या. वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने पाणंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करावेअतिक्रमित पाणंद रस्ते मोकळे करावेतसेच ग्रामपंचायतींकडून आवश्यक प्रस्ताव मागवावेतअसे त्यांनी सांगितले.

            तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने आतापर्यंत झालेल्या कामांची स्वतंत्र छाननी करावीसध्या किती पाणंद रस्ते प्रत्यक्ष वापरात आहेत याचे सर्वेक्षण करावे आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन नियोजनबद्ध आराखडा तयार करावाअशाही स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

             या बैठकीत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यवाहीविभागनिहाय जबाबदारी निश्चित करणे आणि नियमित आढावा घेण्यावर भर देण्यात आला. पाणंद रस्ते म्हणजे केवळ रस्ता नाहीतर शेतकर्याच्या कष्टाला बाजारपेठेपर्यंत पोहोचवणारा मार्ग आहे. त्यामुळे दर्जेदार कामयोग्य नियोजन आणि वेळेत अंमलबजावणी यावर भर दिला पाहिजे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मी स्वतः नियमित आढावा घेणार आहे. चंद्रपूर मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभार्थी झाला पाहिजेअसे ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment

+