चंद्रपूर: IT इंजिनिअरसाठी 70 हजार पगाराची नोकरी, जिल्हाधिकारी कार्यालयात भरती

April 29, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे सिनीअर आयटी असिस्टंटच्या एका पदासाठी मानधन तत्वावर अर्ज मागविण्यात येत आहेसदर पदासाठी उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रता कम्प्युटर इंजिनिअरींगमध्ये पदवी (बी./बी.टेकअसणे आवश्यकतसेच ई-गव्हर्नन्स (e-Governance) क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. (१ मे पासून जनगणना सुरु, काय विचारणार प्रश्न?)

 

Chandrapur IT Job: पात्रता व मानधन किती

सोबतच शासकीय / निमशासकीय प्रकल्पांवरील अनुभव असणे अपेक्षितसंगणक प्रणालीनेटवर्किंगडेटा व्यवस्थापन व सॉफ्टवेअर अंमलबजावणी यांचे ज्ञानआवश्यक आहेउमेदवाराची वयो मर्यादा किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्षे (शासकीय नियमानुसार सवलत लागू ) असावी.  दरमहा 40 हजार ते 70 हजार रुपये प्रति महिना मानधन अनुज्ञेय राहील. (अनुभव व पात्रतेनुसार निश्चित करण्यात येईल)

 

इच्छुक उमेदवारांनी 28 एप्रिल ते 5 मे या कालावधीत (शासकीय सुट्टीचे दिवस सोडूनसामान्य शाखाजिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे अर्ज करावाअर्जासोबत कम्प्युटर इंजिनियरींगची पदवीआधार कार्ड झेरॉक्सजन्म नोंदणी प्रमाणपत्रकामाचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.

Leave a Comment

+