चंद्रपूर: अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट व शेतकरी जमीन वाद, जिल्हाधिकारी मैदानात

April 29, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी (माणिकगड सिमेंटक्षेत्रातील जमिनीच्या संदर्भात बांबेझरीकुसुंबी आणि नोकारी येथील शेतक-यांनी मांडलेल्या विषयावर जिल्हा प्रशासन गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने तोडगा काढत आहेया संदर्भात बुधवारी (दि. 29) जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली गावातील शेतकरी तसेच माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आलीविशेष म्हणजे कुसुंबी आणि नोकारी येथे प्रशासनाचे अधिकारीशेतकरी आणि कंपनीच्या प्रतिनधींसमोर जमिनीची मोजणी करण्यात येईलअसे जिल्हाधिकारी पंत यांनी स्पष्ट केलेयावर उपस्थित शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. (प्रदूषणाच्या गंभीर विषयावर MPCB अधिकाऱ्यावर खासदार संतप्त)

 

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारराजुराचे उपविभागीय अधिकारी रविंद्र मानेउपजिल्हाधिकारी (जमीनसचिन कुमावतभुमी अभिलेख जिल्हा अधिक्षक प्रदीप जगतापतहसीलदार ओमप्रकाश गोंड ( राजुरा), रुपाली मोगरकर (जिवती), पल्लवी आकरे (कोरपना), उपविभागीय पोलिस अधिकारी जाधवपोलि निरीक्षक शिवाजी कदम यांच्यासह माणिकगड कंपनीचे व्यवस्थापक मुकेश गहलोतशेतक-यांच्या वतीने आबिद अलीभाऊराव कन्नाकेकेशव कुडमेथेसुनील मडावीसुनील पेंदोर उपस्थित होते.

 

प्रशासन शेतक-यांच्या बाजुने आहेकोणतेही टोकाचे पाऊल उचलू नकाअसे सांगून जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्याशेतक-यांप्रती प्रशासनाची भुमिका अतिशय सकारात्मक आहेएक महिन्याच्या आत बांबेझरी यथे मौका चौकशी करून तेथे कंपनीचे ओव्हर बर्डन आहे कायाची तपासणी केली जाईलतसेच मंडळ अधिकारीतलाठीभुमी अभिलेख सर्व्हेअरवन विभागाचे प्रतिनिधीपोलिस पाटीलमाणिकगड कंपनीचे अधिकारी आणि जमिनीचा गट क्रमांक / सातबारा ज्या शेतक-यांच्या नावावर आहेत्यांच्या समक्ष कुसुंबी व नोकारी येथे मोजणी करून फोटोसह अहवाल सादर करतीलयाबाबत शेतक-यांना अजूनही काही अडचण असेल तर पुन्हा बैठक घेण्यात येईलअसेही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले.

 

मौजा कुसुंबीबांबेझरी व नोकारी येथील काही शेतक-यांच्या जमिनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या उत्खनन क्षेत्रामध्ये (लिजयेत असून त्याकरीता मोबदला देण्यात यावाअशी मागणी गत काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने करीत आहेहा विषय सकारात्मक दृष्टीने निकाली काढण्याच्या उद्देशाने यापूर्वी उपविभागीय अधिकारीराजुरा यांच्या स्तरावर संबधित शेतकरी व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठका घेवून कार्यवाही करण्यात आलीतसेच 3 डिसेंबर 2024 रोजी भूमापन क्र. 43, 44, 45, 46, 47, 48 ची मौक्यावर प्रत्यक्ष मोजणी करण्यात आलीत्यामध्ये सदर भुमापन क्रमांकामध्ये अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे कोणत्याही प्रकारचे उत्खनन आढळून आले नाहीतसेच संबंधित शेतक-यांची कोणत्याही प्रकारची वहिवाट सदर भुमापन क्रमांकावर आढळून आले नाही तसा अहवाल उपअधिक्षक भूमी अभिलेख राजुरा यांनी सादर केला आहेउपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर यांनी मौजा बांबेझरी येथील स.क्र.44,45,46,47  48 हे संपूर्ण क्षेत्र जंगलाने व्याप्त असून शेती योग्य नाही व वनव्यवस्थापन नकाशा व केएमएल नुसार राखीव वनक्षेत्र क्रमांक 36 मध्ये असल्याचे नमुद केले आहे.

 

सध्या हे प्रकरण दिवाणी न्यायालयचंद्रपूर येथे दाखल असून या प्रकरणात दिवाणी न्यायालयाने 26 डिसेंबर 2025 रोजी अंतरिम ऑर्डर पारीत केले आहेतसेच राज्य मानवी हक्क आयोगासमोर सदर प्रकरण प्रलंबित आहेन्यायालय जो निर्णय देईलत्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास जिल्हा प्रशासन कटिबध्द आहेन्यायप्रविष्ठ बाब असल्याने प्रशासकीय मर्यादा असल्या तरीशेतक-यांच्या न्याय्य हक्कासाठी शासन कायदेशीर चौकटीत राहून सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहेअसेही बैठकीत सांगण्यात आले.

Leave a Comment

+