चंद्रपूर महापौर निवडणूक : बहुमताचा खेळ कोण जिंकणार?

January 23, 2026 by Prakash Hande

OBC Woman Mayor Chandrapur : चंद्रपूर - कांग्रेस पक्षात चंद्रपूर महानगरपालिका महापौर वाद जवळपास मिटला अशी चर्चा आहे. आज कांग्रेस पक्षाचा गटनेता घोषित करण्यात येणार आहे, चंद्रपूर कांग्रेस पक्षाला सर्वाधिक २७ जागा मिळाल्या आहे.कांग्रेस समर्थित ३ अपक्ष मिळून कांग्रेसच्या एकूण ३० जागा आहे, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी कांग्रेस पक्षाला ४ जागेची गरज आहे. शिवसेना-वंचित युतीने मनपाच्या ८ जागेवर विजय मिळविला असून अद्यापही कांग्रेस, सेना व वंचित आघाडी मध्ये सत्ता वाटणी जवळपास झालेली नाही. जर शिवसेना-वंचित आघाडीला सत्तेत योग्य वाटा मिळाला नाही तर वेगळा निर्णय वेळेवर होऊ शकतो. (हे आहे चंद्रपूर महापौर पदाचे संभाव्य दावेदार)

कांग्रेस पक्षात महापौर पदासाठी अनेक दावेदार आहे, पण दोन नेत्यांच्या भांडणात कुणाची लॉटरी लागणार हे अद्यापही स्पष्ट झाले नाही, कांग्रेस पक्ष अगोदर शिवसेना-वंचित ने आपला गट अधिकृत पद्धतीने नोंदणी करीत गटनेतेपदी राहुल वीरूटकर यांचं नाव निश्चित करण्यात आले. कांग्रेस पक्षातील कुरघोडीमुळे अद्यापही गटनेता कोण होणार हे निश्चित झाले नाही. २७ जानेवारीला महापौर पदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. ३० जानेवारीच्या आत महापौर निवडायचा आहे. आमदार वडेट्टीवार यांनी जरी वाद मिटल्याची प्रतिक्रिया दिली असेल तरीही कांग्रेस पक्षात सध्या तरी काही आलबेल नाहीच. OBC Woman Mayor Chandrapur

महापौर पदावर कुणाची वर्णी लागेल यासाठी कांग्रेसच्या नवनियुक्त ओबीसी महिला नगरसेवक मी महापौर बनेल अशी प्रार्थना करीत आहे. जर कांग्रेस पक्षाला बहुमत गाठता आलं नाही तेव्हा भाजप पक्ष काठावर पास म्हणजे बहुमताचा आकडा नक्की पार करेल अशी चिन्हे आहे. भाजपला १० जागेची गरज आहे. वेळेवर भाजप उबाठा-वंचित ला सोबत घेऊ शकतो अशी शक्यता आहे. सध्या सुरु असलेल्या राजकारणात कोण कुणाबरोबर जाणार हे सांगता येत नाही, येत्या २ दिवसात महापौर पद बाबत उमेदवाराचे नाव निश्चित होणार पण तो महापौर कोणत्या पक्षाचा राहणार हे अद्याप निश्चित नाही.

Leave a Comment

+