चंद्रपूर मनपात महिला सत्तेची पुनरावृत्ती; ९ महिला उमेदवार, १ खुर्ची – कुणाच्या गळ्यात माळ?

January 22, 2026 by Prakash Hande

Chandrapur Mayor Reservation : चंद्रपूर - राज्यातील २९ महानगरपालिकेतील महापौर आरक्षण सोडत आज काढण्यात आली. यामध्ये चंद्रपूर महानगरपालिका साठी पाचव्यांदा महिलांना महापौर पदाची संधी देण्यात आली आहे, चंद्रपुरात ५ वी महिला महापौर हि ओबीसी प्रवर्गातील असणार आहे. वर्ष २०१२ ला चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना झाली होती, मनपाच्या पहिल्या निवडणुकीत ओबीसी महिला आरक्षण घोषित झाले होते. कांग्रेसच्या संगीता अमृतकर ह्या चंद्रपूर मनपाच्या प्रथम महिला महापौर झाल्या होत्या. अडीच वर्षांनी सर्वसाधारण महिला त्यावेळी कांग्रेस पक्षातून भाजपात सामील झालेल्या राखी कंचर्लावार ह्या दुसऱ्या महापौर, वर्ष २०१७ ला ओबीसी महिला त्यावेळी तिसऱ्या महापौर भाजपच्या अंजली घोटेकर, अडीच वर्षांनी सर्वसाधारण महिला मनपाच्या चौथ्या महापौर राखी कंचर्लावार यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली होती आता ८ वर्षांनी पुन्हा ओबीसी महिला महापौर आरक्षण निघाले. (कांग्रेस पक्षात घमासान, खासदार आहात मालक नाही - विजय वडेट्टीवार)

चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीत एकही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, पण कांग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला, कांग्रेस व मित्रपक्षाला एकूण ३० जागा, भाजप मित्रपक्षाला २४ जागा शिवसेना उबाठा ६, अपक्ष २, बसपा १ व वंचित आघाडी २ आणि Aimim ला १ जागा मिळाली. कांग्रेस पक्षाला अपक्ष आणि उबाठा चा पाठिंबा आहे, त्यामुळे चंद्रपुरात पाचवा महापौर हा कांग्रेस पक्षाचा असणार आहे. नगरसेवक निवडून आल्यावर कांग्रेस पक्षात महापौर पदावरून अंतर्गत कुरघोडी सुरु आहे.महापौर पदी वडेट्टीवार कि धानोरकर कुणाच्या समर्थकांची वर्णी लागेल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार.

सध्या चंद्रपूर महापौर पदासाठी माजी महापौर कांग्रेस पक्षात ३, भाजपात ३, अपक्ष १, बहुजन समाज पार्टी १ व शिंदेसेना १ असे ९ उमेदवारांपैकी एकाला महापौर पदाची लॉटरी लागणार असून यामध्ये कांग्रेस पक्षातील नगरसेवक संगीता अमृतकर, सुनंदा धोबे, संजिवणी वासेकर, कांग्रेस मित्रपक्षातील मनीषा बोबडे, भाजप पक्षात आशा देशमुख, संगीता खांडेकर, सुनीता राधेश्याम जयस्वाल शिवसेना शिंदे डिलन केळझरकर व बहुजन समाज पक्षाच्या सोनिया उंदीरवाडे सह ९ महिला उमेदवार समावेश आहे. चंद्रपूर मनपाच्या वर्ष २०१२ मधील प्रथम महापौर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.Chandrapur Mayor Reservation    

Leave a Comment

+