Chandrapur local news fatal accident : मूल: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात मंगळवारी (दि. २५) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रेल्वे गेटजवळील गतिरोधक लक्षात न आल्याने स्कूटी उसळली आणि मागे बसलेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला.
प्रभाकर वांगलवार व त्यांची पत्नी लता वांगलवार हे दोघे आपल्या दुचाकीने सिंदेवाहीला जात होते, मूल शहरात पोहोचताच रेल्वे गेटजवळ गतिरोधक न दिसल्याने दुचाकी वाहन वेगात आदळल्याने लता वांगलवार ह्या दहा फूट पर्यंत फरफटत गेल्या, या अपघातात लता वांगलवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. लता वांगलवार ह्या जटपुरा गेट हॉस्पिटल वॉर्ड चंद्रपूर मध्ये राहत होत्या.
अपघातानंतर त्यांना तातडीने मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचाराचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वांगलवार कुटुंबियांवर आणि चंद्रपूर परिसरात शोककळा पसरली आहे.
Leave a Comment