चंद्रपूर: महाशिवलिंग क्षेत्राचा कायापालट होणार? WCL कडून विकासकामांचा आढावा

April 29, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - शहरालगत असलेल्या महाशिवलिंग परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता गती मिळताना दिसत आहे. त्यांच्या पुढाकारातून वेकोलीचे सिएमडी हेमंत पांडे यांनी आमदार किशोर जोरगेवार व विविध संबधित अधिका-यांसह महाशिवलिंग क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करत प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेतला. (चंद्रपुरातील तापमान ४५ पार, काळजी घ्या मनपाचा इशारा)

 

             यावेळी वेकोलीचे महाप्रबंधक संजिव रेड्डीमनपा उपअभियंता आशिष  भारतीसार्वजनिक बांधकाम विभाागचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता साबळेभारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारमहामंत्री सविता दंढारेरविंद्र गुरुनुलेबलराम डोडाणीमनपा गटनेते शेखर शेट्टीअजय जयसवालतुषार सोमश्याम ढोपटेपिं्रन्स प्रसाद आदिंची उपस्थिती होती.

 

                 या पाहणीदरम्यान आमदार जोरगेवार यांनी महाशिवलिंग Mahashivling क्षेत्राच्या एतिहासिक धार्मिकसांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या असलेल्या महत्त्वावर विशेष भर देतयेथे येणार्या हजारो भाविकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले. वाढत्या भाविकसंख्येमुळे पाणीस्वच्छतारस्तेप्रकाशव्यवस्था आणि सुरक्षेच्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी यावेळी बोलुन दाखविली.

 

  आमदार जोरगेवार यांनी वेकोलि प्रशासनासमोर सविस्तर विकास आराखडा मांडत पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी आरओ प्लांटजलपुरवठा सुधारणामंदिर परिसराचे सुशोभीकरणसुरक्षा भिंतसोलर हायमास्ट लाईटप्रशासकीय कार्यालयतसेच भक्तांसाठी निवास व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा केली. यासोबतच महाशिवलिंगपर्यंत जाणार्या मार्गाचे मजबुतीकरणस्वागतद्वारांची उभारणीदिशादर्शक फलकस्वच्छतागृहे आणि परिसरातील स्वच्छता मोहीम यांसारख्या सुविधांवरही त्यांनी विशेष भर दिला.

 

  पाहणीदरम्यान वेकोलि अधिकार्यांनीही या प्रस्तावांचा सकारात्मक विचार करण्याचे संकेत दिले असून आवश्यक तांत्रिक व आर्थिक बाबींचा आढावा घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. आमदार जोरगेवार यांनी या कामांसाठी वेकोलिकडून आवश्यक निधी व तांत्रिक सहकार्य मिळावेयासाठी पुढील स्तरावरही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

  महाशिवलिंग क्षेत्राचा विकास झाल्यास चंद्रपूरच्या पर्यटन नकाशावर या स्थळाला नवे स्थान मिळेलतसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतीलअसा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. त्यांच्या पुढाकारामुळे महाशिवलिंग परिसराचा कायापालट होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पउले आहे. 

Leave a Comment

+