चंद्रपूर : Yuvasena Chandrapur ची ताकद आता अधिक वाढणार आहे. चंद्रपूर येथे ‘Gen Z’ तरुणांनी युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात ऐतिहासिक प्रवेश केला आहे. अलिकडेच नीट (NEET) पेपर फुटीविरोधात तरुणांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे युवकांची ताकद समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर सीडीसीसी बँक सभागृहात आयोजित सोहळ्यात शेकडो तरुणांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या कार्यक्रमात युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल आणि जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. सोबतच अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नव्या जबाबदाऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
नीट पेपर फुटी आंदोलन आणि ‘Gen Z’ तरुणांची राजकीय भूमिका
राजकारणात सर्वात महत्त्वाचा दुवा असणारा आजचा युवक, विशेषतः ‘Gen Z’ पिढी, देशाच्या राजकारणाला नवी दिशा देण्यास सज्ज झाली आहे. अलिकडेच दिल्लीत नीट (NEET) पेपर फुटीविरोधात तरुणांनी पुकारलेल्या आंदोलनाने केंद्र सरकारला हादरवून सोडत युवशक्तीची ताकद दाखवून दिली. आजच्या याच जागरूक तरुणांना राजकारणाची ओढ लागली असून, त्यांना संघटित करून राजकारणात आणण्याचे कार्य चंद्रपुरातील युवासेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) करत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी, १६ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथील सीडीसीसी बँक सभागृहात ‘Gen Z’ युवकांचा ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
या सोहळ्याचे अध्यक्षपद युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल यांनी भूषवले. व्यासपीठावर माजी नगरसेवक व शिवसेना महानगरप्रमुख सुरेश पचारे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख तथा चंद्रपूर-गडचिरोली संपर्कप्रमुख राजेश नायडू, युवासेना सहसचिव व युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील, माजी तालुकाप्रमुख प्रकाश खनके, शिवसेनेच्या माजी जिल्हा संघटिका कुसुमताई उदार आणि युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘युवकांनी स्वतःला नेतृत्व समजावे’: जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे
उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे म्हणाले की, शिवसेना हा मराठी अस्मितेसाठी लढा देणारा आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा पक्ष आहे. सत्ता असो वा नसो, सामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे हीच शिवसेना व युवासेनेची ओळख आहे. आज मोठ्या संख्येने ‘Gen Z’ तरुण पक्षात प्रवेश करत आहेत. या पक्षात आल्यावर कोणीही स्वतःला एकटे समजू नये; युवासेना व शिवसेना हे एका कुटुंबाप्रमाणे सर्वांवर प्रेम करणारे संघटन आहे. पुढे बोलताना त्यांनी युवकांना आवाहनांना धीराने तोंड देण्याचा सल्ला दिला. आपल्या परिसरातील समस्यांवर खचून न जाता त्या कशा सोडवायच्या यावर विचार करा, कारण प्रत्येक युवक स्वतः एक नेतृत्व आहे. समस्या सुटत नसतील, तर तुमचा हा भाऊ – विक्रांत सहारे आणि संपूर्ण युवासेना तुमच्या पाठीशी ताकदीने उभी आहे. सत्तेच्या विरोधात जाऊनही तुम्हाला न्याय मिळवून देण्याची ताकद आमच्या पक्षात आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष: संदीप रियाल पटेल
युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. शिवसेना हा जाती-पातीत भेद करणारा नाही, तर सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष आहे. कोविडसारख्या जागतिक महामारीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला कुटुंबाप्रमाणे जपले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. नीट पेपर फुटी प्रकरणावर बोलताना पटेल म्हणाले की, या आंदोलनाला सर्वात आधी पाठिंबा शिवसेनेने दिला होता आणि आज आमचा पक्ष पूर्ण ताकदीने तरुणांच्या पाठीशी उभा आहे. चंद्रपुरातील या भव्य पक्षप्रवेशाचे श्रेय त्यांनी विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वाला दिले. सहारे यांनी नेहमीच नागरिकांच्या प्रश्नांवर आंदोलने करून सत्ताधाऱ्यांना जागे करण्याचे काम केले आहे. तसेच, पक्ष फुटीच्या काळातही निष्ठा कायम ठेवणाऱ्या कुसुमताई उदार यांची निष्ठा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे सांगत त्यांनी सर्वांनी संघटित होत अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले.
नेत्यांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘Gen Z’ युवकांचा भगवा धागा बांधून पक्षात अधिकृत प्रवेश करण्यात आला. सोबतच, पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटन वाढीसाठी महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. यामध्ये महेश श्रीगिरीवार युवा सेना उपजिल्हाप्रमुख बल्लारशा विधानसभा, सोहेल नौशाद खान विधानसभा समन्वयक बल्लारशा, सागर गबने युवासेना तालुकाप्रमुख चंद्रपूर, फरदिन सय्यद शहर प्रमुख चंद्रपूर ,पवन ऊकडे तालुका समन्वयक चंद्रपूर निखिल मेकेलवार शहर प्रमुख बल्लारशा यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी उपस्थित सर्व तरुण आणि मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी पवन भाऊ नगराळे, बंटी कमटम उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर,विपीन कोंगरे, अंकुश वाढंरे तालुकाप्रमुख राजूरा,नीरज यादव तालुकाप्रमुख,अमित मालेकर तालुकाप्रमुख राजूरा, स्वप्निल पाटील उपशहरप्रमुख,प्रशांत गड्डाला तालुका समन्वय, सोनू श्रीनिवास, गौरव नाडमवर,केतन दयालवार, श्रीकांत दडमल उपशहरप्रमुख, सागर धनकसर विभाग प्रमुख,हंसराज खरोले उपतालुका ,अनिकेत भरने , चेतन बोबडे शहरप्रमुख, जय हिकरे,हर्षल खनके शहरसमन्वयक,सार्थक शिर्के, प्रविण पेटकर तालुका सरचिटणीस ,अक्षय शिरसाट,पराग कुत्तरमारे ,रितिक रायपुरे, अंशु रायपुरे,उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






