Chandrapur Accident News प्रसंगी वलनी-बोर्डा वळणावरील अपघातात ग्रस्त कार व पोलीस पंचनामा

चंद्रपूर पोलीस दलावर शोककळा; कर्तव्यदक्ष महिला पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 17, 2026

चंद्रपूर : Chandrapur Accident News समोर आली असून चंद्रपूर-मूल मार्गावर भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत नागभीड येथील महिला पोलीस शिपाई विशाखा बनसोड यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १७ ऑगस्ट रोजी सकाळी वलनी-बोर्डा वळणावर घडली. जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित उजळणी अभ्यासक्रमासाठी त्या कारने निघाल्या होत्या. प्रवास दरम्यान समोरून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या घटनेमुळे चंद्रपूर पोलीस दलात आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर पोलिसांचा मुद्देमाल हस्तांतरण सोहळा)

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित उजळणी अभ्यासक्रमासाठी (रिफ्रेशर कोर्स) विशाखा बनसोड या कारने चंद्रपूरकडे निघाल्या होत्या. प्रवास दरम्यान वलनी-बोर्डा वळणावर समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारसोबत त्यांच्या वाहनाची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात विशाखा बनसोड यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. कर्तव्यावर जात असतानाच काळाने अचानक घाला घातल्याने चंद्रपूर पोलीस दलात शोककळा पसरली आहे. तर या घटनेमुळे बनसोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment