Pombhurna Accident News

पोंभूर्णा अपघाताची भीषणता; शेतकरी दगावला, ट्रकचालक पसार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 6, 2026

पोंभुर्णा – चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात (Pombhurna Accident News) शनिवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वार शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. नवेगाव मोरे ते दिघोरी बसस्टॉप दरम्यान नाल्यावरील पुलाजवळ ही घटना घडली. भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. (गांजा तस्करीमध्ये आता महिलांचाही सहभाग, घरून गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक)

Pombhurna Accident News: वळणावर अज्ञात ट्रकची धडक

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात शनिवारी (५ जुलै) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नवेगाव मोरे ते दिघोरी बसस्टॉपदरम्यान नाल्यावरील पुलाजवळ भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात ट्रकने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला असून पोंभूर्णा पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


मृतकाचे नाव दिवाकर आनंदराव कुळमेथे (वय ४६, रा. चिमनाहेटी, ता. पोंभूर्णा) असे आहे. ते शेती व्यवसाय करीत होते. शनिवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या हिरो होंडा ग्लॅमर (क्रमांक MH 34 W 8343) दुचाकीने चिमनाहेटी येथून नांदगावकडे कामानिमित्त जात होते. त्यावेळी नवेगाव मोरे ते दिघोरी बसस्टॉपदरम्यान नाल्यावरील पुलाजवळील वळणावर समोरून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली.

या भीषण धडकेत दिवाकर कुळमेथे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात घडताच ट्रकचालकाने कोणतीही मदत न करता ट्रकसह घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मृतकाचे पुतणे संदीप मधुकर कुळमेथे यांनी पोंभूर्णा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागोराव गोसाई नैताम करीत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment