मूल : Mul Accident News Today बाबत एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. नागपूर रस्त्यावरील लक्ष्मीनारायण राईस मिलसमोर सायंकाळी भीषण अपघात घडला. भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात राहुल नारायण पाल आणि त्यांची ३ वर्षांची मुलगी ईशा यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे बाजार करून आपल्या बोंडाळा गावी परत जात होते. अपघाताची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे बोंडाळा परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. (हे हि वाचा – संतापजनक घटना, वडिलाने चिरला मुलाचा गळा)
राहुल नारायण पाल (वय ३५ वर्षे) आणि त्यांची अवघ्या ३ वर्षांची चिमुकली मुलगी ईशा राहुल पाल अशी या अपघातातील मृतकांची नावे आहेत.
बाजारावरून घरी परतताना काळाचा घाला प्राप्त माहितीनुसार, राहुल पाल हे आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह बाजाराची खरेदी करून दुचाकीने आपल्या ‘बोंडाळा (भूज)’ या मूळ गावी परत जात होते. दरम्यान, नागपूर रोडवरील लक्ष्मीनारायण राईस मिलजवळ समोरून आलेल्या एका भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. अपघाताचा फटका इतका तीव्र होता की, राहुल आणि त्यांची चिमुकली ईशा हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले अन् गंभीर दुखापत झाल्याने दोघांचीही प्राणज्योत घटनास्थळीच मालवली.
पोलीस घटनास्थळी दाखल भीषण अपघाताची माहिती मिळताच मूल पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले.
पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर या अकस्मात घडलेल्या दुर्दैवी अपघातामुळे पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा तिच्या वडिलांसह असा दुर्दैवी अंत झाल्याचे समजताच नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






