Chandrapur Crime News Marathi police investigation at Durgapur

चंद्रपुरात क्रूरतेची सीमा ओलांडली! कौटुंबिक वादातून निर्दयी पित्याने केली ८ वर्षीय मुलाची हत्या

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 10, 2026

चंद्रपूर – Chandrapur Crime News Marathi अंतर्गत एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. चंद्रपूर येथील शक्तिनगर वेकोलि वसाहतीत एका पित्याने स्वतःच्या दोन मुलांवर ब्लेडने प्राणघातक हल्ला केला. (हे हि वाचा – पडोली मध्ये बंद घर फोडले)

या हल्ल्यात ८ वर्षांचा निष्पाप मुलगा जागीच ठार झाला. तर १२ वर्षांचा दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शक्तीनगर वेकोलि वसाहतीमध्ये राहणाऱ्या ४९ वर्षीय मंगेश भारत बदखल या पित्याने ८ वर्षीय देवांश मंगेश बदखल व १२ वर्षीय रुद्रांश बदखल यांच्या गळ्यावर ब्लेडने वार केला, पित्याच्या या क्रूर हल्ल्यात देवांश ठार झाला तर रुद्रांश हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

शक्तीनगर मधील M २९ या क्वार्टर मध्ये आरोपी मंगेश हा लहान भाऊ राहुल सोबत राहत होता. राहुल हा वेकोलि मध्ये कार्यरत असून मंगेश ऑटो चालवीत मुलांचे पालन-पोषण करीत होता. सततचे भांडण व मारहाणीमुळे त्रासलेल्या बायकोने घर सोडले, वर्षभरापासून मंगेश हा पत्नीपासून विभक्त राहत होता, राहुल बदखल ची पत्नी सुद्धा त्याला सोडून माहेरी गेली होती. क्वार्टर मध्ये २ भाऊ व २ मुले राहत होते.

१० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आरोपी पिता घरी आला, मुले मला न्यायचे आहे असे भांडण फोनवर मंगेश व त्याच्या पत्नीचे होत होते, मनात त्या गोष्टीचा राग पकडून आज मंगेशने दोन्ही मुलांवर ब्लेडने वार केला, मात्र पित्याने केलेल्या या हल्ल्याचा वार ८ वर्षीय देवांश सहन करू शकला नाही, तो जागीच मरण पावला, सदर बाब हि शेजाऱ्यांना कळली असता त्यांनी तात्काळ दोन्ही मुलांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेले. या क्रूर घटनेत रुद्रांश वाचला असून त्याचेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. आरोपी मंगेश बदखल यांच्यावर वर्ष २०२४ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. मुलाची हत्या केल्यावर आरोपी मंगेश ने घटनास्थळावरुन पळ काढला. दुर्गापूर पोलिसांनी आरोपीला तुकूम तलाव भागातून अटक केली. आरोपी मंगेश बदखल वर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment