भद्रावतीतील नाग मंदिरासमोर घडलेल्या Bhadrawati Contractor Murder प्रकरणी पोलिसांची कारवाई

भद्रावतीत नाग मंदिरसमोर ठेकेदाराची हत्या, पैशांच्या वादातून मजूर बंधूंना अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 23, 2026

भद्रावती/चंद्रपूर – Bhadrawati Contractor Murder प्रकरणी भद्रावती पोलिसांनी काही तासांतच दोन आरोपींना अटक केली आहे. २३ सप्टेंबर रोजी सकाळी भद्रावतीतील नाग मंदिरासमोर बांधकाम ठेकेदार उमदेव भावराव मेश्राम (वय ४०) यांची त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करणाऱ्या श्रेयश पुल्ली आणि त्याचा भाऊ वैभव पुल्ली यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. मजुरीचे पैसे वेळोवेळी न मिळाल्याने आलेल्या रागातून हा हल्ला झाल्याचे तपासात समोर आले आहे. भर रस्त्यावर घडलेली ही घटना नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिली आणि तातडीने पोलिसांना कळवली.

Bhadrawati Contractor Murder: नाग मंदिरसमोर नेमकं काय घडलं?

पैश्याच्या वादात भर चौकात सकाळी ठेकेदाराची मजुराने गळा चिरत हत्या केली. २३ सप्टेंबर रोजी भद्रावती शहरातील नाग मंदिर समोर हि घटना घडली, पोलिसांनी या प्रकरणी २ आरोपीना अटक केली आहे. ४० वर्षीय उमदेव भावराव मेश्राम राहणार देउरवाड़ा, हल्ली मुक्काम प्रज्ञा वाचनालय पंचायत समितीजवळ भद्रावती असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा बांधकाम ठेकेदार होता.

बुधवारी सकाळी मृतक उमदेव हा आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३४ क्यू २५१३ ने पान टपरीवरून खर्रा घेऊन निघाला होता. त्याचवेळी दोघांनी उमदेव ची भर रस्त्यात वाट अडवीत, पैश्याबाबत विचारणा केली मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने दोघांनी उमदेव च्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला, या हल्ल्यात उमदेव यांचा जागीच मृत्यू झाला.

भर रस्त्यात घडलेला गुन्ह्याचा हा प्रकार नागरिकांनी डोळ्यासमोर बघितला, याबाबत नागरिकांडी तात्काळ पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळ गाठत, तपासाला सुरुवात केली. आरोपीच्या शोधासाठी भद्रावती पोलिसांनी पथकाला पाचारण करीत या प्रकरणी दोन आरोपीना अटक केली.

उमदेव मेश्राम कोण होते आणि हल्ला कसा झाला?

पोलिसांनी २० वर्षीय श्रेयश पुल्ली व २५ वर्षीय वैभव पुल्ली या दोघांना अटक केली, उमदेव ची हत्या का केली याबाबत अधिक तपास केला असता उमदेव मेश्राम हा बांधकाम ठेकेदार असून त्याच्याजवळ श्रेयश मजूर म्हणून काम करीत होता, मात्र वेळोवेळी पैसे उमदेव देत नसल्याने पैश्याची आर्थिक चणचण श्रेयश ला जाणवली. काम झाल्यावर पैश्याची मागणी करीत असताना उमदेव पैसे देत नव्हता.

त्यामुळे श्रेयश च्या मनात उमदेव बाबत राग उफाळून आला. २३ सप्टेंबर ला श्रेयश ने सख्खा भाऊ वैभव पुल्ली ला सोबत घेत नाग मंदिर समोर उमदेव ला गाठले. त्यावेळी सुद्धा पैसे कधी देणार अशी विचारणा दोन्ही भावंडानी केली, मात्र त्यावेळी आज देतो, उद्या देतो असे म्हटल्यावर श्रेयश ने मागेपुढे न बघता धारदार शस्त्राने उमदेव च्या मानेवर व गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात उमदेव चा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. भद्रावती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीना अटक करण्यास काही तासातच यश मिळविले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment