padoli chandrapur burglary spot police investigation

पडोली येथे बंद घर फोडले; २ लाख ७ हजारांचे दागिने-रोख लुटले!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 10, 2026

चंद्रपूर: padoli chandrapur burglary मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सुमठाणा परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीराम नगर येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने लाखोंचा ऐवज लांबवला. अंकिता पंधिरिया यांच्या घरात ही घटना घडली. चोरट्याने २ लाख ७ हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पळवली आहे. पडोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम नगर सुमठाणा येथील रहिवासी सौ. अंकिता भावेश पंधिरिया (वय ३४) या आपल्या कुटुंबासह अमोल वेलेकर यांच्या घरी भाड्याने राहतात. त्यांचे पती चंद्रपूर येथील महाकाली स्विट मार्ट येथे कामाला असून कामाच्या निमित्ताने शहरातच राहतात. दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास अंकिता यांचे पती चंद्रपूरला गेले होते, तर भाऊ कामाच्या निमित्ताने गडचिरोली येथे गेला होता. घर बंद करून अंकिता आपल्या मुलांना आणि आईला घेऊन जवळच राहणाऱ्या मेहुणीकडे (अल्का मोहुरले) रात्री झोपण्यासाठी गेल्या होत्या. (हे हि वाचा – चंद्रपुरात चैन स्नॅचिंग)

दुसऱ्या दिवशी, म्हणजे ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास अंकिता मुलाला घेऊन घरी परतल्या असता, मुख्य गेटचे कुलूप उघडून आत प्रवेश केल्यावर त्यांना घरातील खोलीचे कुलूप तुटून खाली पडलेले दिसले. घरात आत जाऊन पाहणी केली असता, हॉलमध्ये ठेवलेली लोखंडी अलमारी खाली पाडलेली आणि तिचे दोन्ही दरवाजे उघडे दिसून आले. अलमारीतील सर्व सामान अस्तव्यस्त पसरले होते.

२ लाख ७ हजार रुपयांच्या मुद्देमालात काय चोरी झाले?

अलमारीची पाहणी केली असता, त्यातील सोन्याचे दागिने आणि रोकड गायब असल्याचे निष्पन्न झाले. चोरट्याने अलमारीतून ४८ हजार रुपये किमतीची सोन्याची चपला कंठी (१६ ग्रॅम), ३० हजार रुपयांचा सोन्याचा गोफ (१० ग्रॅम), ३० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र (५ ग्रॅम), १५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी (५ ग्रॅम), ९ हजार रुपयांचे सोन्याचे गोल रिंग (३ ग्रॅम), ३० हजार रुपयांचा सुई-धागा (५ ग्रॅम), ६ हजार रुपयांची नथ (१.५ ग्रॅम), १५ हजार रुपयांचे नाकातील ६ नग लेसर (२ ग्रॅम), ६ हजार रुपयांची कानातील बाली (अर्धा ग्रॅम), ६ हजार रुपयांचे स्टेनलेस दोन नग (१ ग्रॅम), ३ हजार रुपयांचे ६ पोकळ मणी (१ ग्रॅम) आणि लॉकरमध्ये ठेवलेली ९ हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या घटनेनंतर अंकिता पंधिरिया यांनी तात्काळ पडोली पोलीस ठाण्यात जाऊन आपबिती सांगितली व लेखी तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पडोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३३१(४) आणि ३०५ अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वीरेंद्र देविदास केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर तपासाच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे सुमठाणा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment