चंद्रपूर, दिनांक १७ नोव्हेंबर: बाबुपेठ घरफोडी प्रकरणात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप आणि कपाटाचे लॉकर तोडून १ लाख ५४ हजार ३०० रुपयांचे दागिने चोरले. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, समता चौक परिसरातील एका भाड्याच्या घरात ही घटना घडली. बी.एन.एस. कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये तपास सुरू आहे. (बस मध्ये चढताना महिलेचे दागिने लंपास, चंद्रपुरातील घटना, वाचा बातमी)
बाबुपेठमध्ये नेमके काय घडले? बाबुपेठ घरफोडी
कुटुंबासह बाहेरगावी गेलेल्या एका बंद घराचा ताबा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची मोठी घटना चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील समता चौक, तक्षशिला विहाराजवळ असलेल्या एका भाड्याच्या घरात अज्ञात चोरांनी मुख्य दरवाजाचे कुलूप व आतील कपाटाचे लॉकर तोडून तब्बल १ लाख ५४ हजार ३०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले आहेत. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बी.एन.एस.) कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या गंभीर घरफोडीचा तपास वेगाने सुरू केला आहे.
बंद घराचे कुलूप आणि कपाटाचे लॉकर तोडले, बाबुपेठ घरफोडी
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी भावना बादल उमरे (वय ३४ वर्षे, रा. समता चौक, तक्षशिला विहाराजवळ, बाबुपेठ, प्रफुल कांबळे यांचे भाड्याचे घर, चंद्रपूर) या आपल्या परिवारासह सदर ठिकाणी राहत असून गृहिणी आहेत. गत ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्या आपले पती व मुलाबाळांसह फिरण्यासाठी घराला कुलूप लावून मुंबई येथे गेल्या होत्या. त्या मुंबईत फिरत असताना, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांची बहीण वणमाला महादेव झोडे हिने त्यांना फोन करून घराचे मुख्य दार लॉक नसल्याचे आणि तुम्ही घरी परत आला का, अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादीने आपण ट्रेनने परतत असून घराकडे लक्ष ठेवण्यास सांगून फोन ठेवला होता.
दरम्यान, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती चंद्रपुरात आपल्या घरी पोहोचले. त्यांनी घराची पाहणी केली असता मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले असून कडी-कोंडा लावलेला होता. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता बेडरुममधील अलमारीचा दरवाजा खुला होता आणि आतील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. अलमारीचे लॉकर देखील उघडे असल्याचे दिसून आले. लॉकरमधील प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोराने लांबवल्याचे बाबुपेठ घरफोडी प्रकरणात स्पष्ट झाले.
बाबुपेठ घरफोडी मधील चोरीला गेलेल्या दागिन्यांचा तपशील
चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक (किंमत ९,५०० रुपये), ४ ग्रॅम वजनाचे २ गहू मणी (किंमत ८,००० रुपये), २ ग्रॅम वजने ३६ गोल मणी मंगळसूत्राचे (किंमत ३,००० रुपये), ५ ग्रॅम वजनाचे नवीन घेतलेले सोन्याचे झुमके (किंमत ३५,००० रुपये), ५ ग्रॅम वजनाचा नवीन सोन्याचा गोप (किंमत ४१,००० रुपये), १ ग्रॅम वजनाचे धम्मचक्र असलेली जिवती सोन्याची साखळी (किंमत ४,००० रुपये), प्रत्येकी १ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (किंमत ८,००० रुपये), ३ ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी (किंमत १२,००० रुपये),
प्रत्येकी २ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (किंमत १६,००० रुपये), १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॅप्स (किंमत ४,००० रुपये), तसेच ८ ग्रॅम वजनाची चांदीची चाळ (किंमत ७,८०० रुपये) आणि ४ तोळे वजनाचे चांदीचे जोडवे (किंमत ६,००० रुपये) असा एकूण ३२ ग्रॅम सोन्याचा आणि ४८ ग्रॅम चांदीचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
बाबुपेठ घरफोडी प्रकरणात चंद्रपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल
घरकुलूप व अलमारी तोडून घरात प्रवेश करत मोठा ऐवज चोरीला नेल्याप्रकरणी भावना उमरे यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात येऊन तोंडी फिर्याद दिली. त्यांच्या या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल प्रकाश घुगे हे करत आहेत. बंद घरांना लक्ष करणाऱ्या चोरांच्या या कृत्यामुळे बाबुपेठ व शहर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






