Rajura Crime News retired teacher house burgled in kisan ward

सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडले; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 7, 2026

राजुरा: Rajura Crime News अंतर्गत शहरात एक मोठी चोरीची घटना समोर आली आहे. किसान वॉर्ड परिसरात सेवानिवृत्त शिक्षकाचे बंद घर फोडण्यात आले.

कुटुंब वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डल्ला मारला. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करण्यात आला. कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण २.५० लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. राजुरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Rajura Crime News : बंद घराचे कुलूप तोडून अडीच लाखांची चोरी

कुटुंब वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी एका सेवानिवृत्त शिक्षकाचे बंद घर फोडून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना राजुरा शहरात उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी कपाटातील रोख दोन लाख रुपये आणि पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा ऐवज पळवून नेला असून, या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे हि वाचा – महागड्या कारमधून दारू तस्करी)

दोन लाखांची रोकड आणि ५० हजारांचे सोन्याचे दागिने पळवले

राजुरा येथील बल्लारपूर रोडवरील किसान वॉर्ड परिसरात वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त शिक्षक महेश अंबादास अरके (वय ६२) हे ५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास संपूर्ण कुटुंबासह नागपूर येथे एका कौटुंबिक वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. घराला कुलूप लावून गेलेले अरके कुटुंब ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास नागपूरवरून घरी परत आले. त्यावेळी घराच्या बाहेरील गेटचे कुलूप व्यवस्थित असल्याचे दिसून आले, मात्र मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले तसेच दरवाजाजवळ एक पक्कड (पेंचीस) पडलेली आढळली.

घरात प्रवेश करून पाहणी केली असता दोन्ही शयनकक्षांमधील (बेडरूम) कपाटांचे सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटांचे लॉकर तोडून त्यातील २ लाख रुपयांची रोकड, अंदाजे २० हजार रुपये किमतीच्या ४ ग्रॅम सोन्याच्या बिऱ्या आणि ३० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी महेश अरके यांच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी निरीक्षक नितीनकुमार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सुभाष लोकरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment