चंद्रपूर बस स्थानकावर बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी, चंद्रपूर बस स्थानक चोरी

चंद्रपूर बस स्थानकावर गर्दीत महिलेच्या पर्समधून ३ लाख ४४ हजारांचे दागिने चोरी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 17, 2026

चंद्रपूर, दिनांक १७ नोव्हेंबर: चंद्रपूर बस स्थानक चोरी प्रकरणात गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका महिला प्रवाशाच्या पर्समधील दागिने लंपास केले. पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत ३ लाख ४४ हजार ५०० रुपये आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात १६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला असून, बी.एन.एस. कलम ३०३(२) अन्वये तपास सुरू आहे.

चंद्रपूर बस स्थानकावर नेमके काय घडले? चंद्रपूर बस स्थानक चोरी प्रकरण

सणासुदीच्या व प्रवासाच्या काळात गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी चंद्रपूर बस स्थानकावर पुन्हा एकदा हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूर बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना झालेल्या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका महिला प्रवाशाच्या पर्समधील तब्बल ३ लाख ४४ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बी.एन.एस.) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (सीएसटीपीएस मध्ये ६०० किलोचे साहित्य चोरीला, एलसीबी ने लावला छडा)

गडचिरोलीच्या बसमध्ये चढताना गर्दीत चोरी, चंद्रपूर बस स्थानक चोरी

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी सौ. कल्पना राजू बल्लेरवार (वय ५४ वर्षे, रा. साने गुरुजी दत्त मंदिरामागे, स्वास्तीकायण अपार्टमेंट, भद्रा, रामनगर, चंद्रपूर) या आपल्या परिवारासह चंद्रपुरात राहतात. गत १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्या व त्यांचे पती राजू शंकरराव बल्लेरवार हे भाऊबीजेनिमित्त आपल्या गडचिरोली येथील मूळ गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. घरी कोणी नसल्यामुळे त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे व त्यांच्या पतीचे सोन्या-चांदीचे दागिने एका पर्समध्ये सोबत घेतले होते आणि ते भद्रावती बस स्थानकावर आले होते. मात्र, भद्रावतीवरून गडचिरोलीसाठी थेट बस न मिळाल्यामुळे त्यांनी नागपूरहून चंद्रपूरकडे येणाऱ्या बसने प्रवास केला आणि त्या चंद्रपूर बस स्थानकावर येऊन उतरल्या.

चंद्रपूर बस स्थानकावरून गडचिरोली जाण्यासाठी दुपारी १:५० वाजताच्या सुमारास बस आली असता, बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती. याच गर्दीची व धक्काबुक्कीची संधी साधत अज्ञात चोरट्याने फिर्यादी महिलेच्या हातातील पर्सची चैन उघडून त्यातील सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने लांबवले. बसमध्ये चढल्यानंतर महिलेने आपली पर्स तपासून पाहिली असता, पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घाबरलेल्या स्थितीत त्यांनी व त्यांच्या पतींनी लगेच बसमधून खाली उतरून पर्सची खात्री केली, परंतु तोपर्यंत चोराने डल्ला मारला होता.

चंद्रपूर बस स्थानक चोरी, चोरीला गेलेल्या दागिन्यांचा तपशील

चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये अंदाजे ६.५० ग्रॅम वजनाचे व ४५,५०० रुपये किमतीचे सोन्याचे कानातले (दोन जोड रिंगा), ६ ग्रॅम वजनाची ४२,००० रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम वजनाची ३५,००० रुपये किमतीची दुसरी सोन्याची अंगठी, ११ ग्रॅम वजनाचे ७७,००० रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, २० ग्रॅम वजनाची १ लाख ४० हजार रुपये किमतीची सोन्याचा गोफ तसेच २० ग्रॅम वजनाचे ५,००० रुपये किमतीचे चांदीचे जोडवे व चाळ असा एकूण ३ लाख ४४ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल, चंद्रपूर बस स्थानक चोरी

गर्दीचा फायदा घेत सोन्या-चांदीचे दागिने लांबवल्याप्रकरणी सौ. कल्पना बल्लेरवार यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून १६ नोव्हेंबर २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ रामचंद्र साळुंखे हे करत आहेत. बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोराचा शोध घेतला जात असून, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

2 thoughts on “चंद्रपूर बस स्थानकावर गर्दीत महिलेच्या पर्समधून ३ लाख ४४ हजारांचे दागिने चोरी”

Leave a Comment