चंद्रपूर: Nagpur Women Gang Arrested प्रकरणात चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी अत्यंत जलद कारवाई करत मोठी यशप्राप्ती केली आहे. चंद्रपूर मुख्य बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या एका ५३ वर्षीय महिला मजुराच्या पर्समधून सुमारे २ लाख १७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. पोलिसांनी अवघ्या काही तासांत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाठलाग करून नागपूरच्या ४ सराईत महिलांना ताब्यात घेतले. १ ऑगस्ट २०२६ रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी वरोरा येथील आनंदवन चौकात ट्रॅव्हल्स अडवून सर्व चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (हे हि वाचा – बाबुपेठमध्ये सुरु होता जुगार, पोलीस धडकली)
चंद्रपूर मुख्य बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने लांबवले
मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी नगीनाबाग परिसरातील चोरखिडकीजवळ राहणाऱ्या सुधा नारायण तुरकेले (वय ५३) या महिला नागपूरला जाण्यासाठी चंद्रपूर बसस्थानकावरील नागपूर प्लॅटफॉर्मवर बसची वाट पाहत उभ्या होत्या. नागपूर बस आल्यावर गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढत असताना अज्ञात चोराने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले ७२ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके आणि १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण २ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चाणाक्षीने लांबवला. बसमध्ये चढल्यानंतर पर्स तपासली असता सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ रामनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३ (२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवून तपासाची सूत्रे वेगाने हलवली.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी तात्काळ दोन विशेष पथके तयार केली. पहिल्या पथकाला बसस्थानक परिसरात तपासासाठी पाठवण्यात आले, तर दुसऱ्या पथकाने नागपूर मार्गावरील पडोली चौकात पाळत ठेवली. बसस्थानका परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारीक पाहणी करत असताना पडोली चौकात दोन महिला अत्यंत संशयास्पदरित्या वावरताना दिसून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे रूपा विशाल नाडे (वय २५) आणि मैना महेंद्र मानकर (वय ३५, दोघे रा. रामेश्वरी टोली, नागपूर) अशी सांगितली.
संशयित महिलांना विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यांनी चंद्रपूर बसस्थानकावरून चोरलेले सोन्याचे दागिने आपल्या इतर दोन साथीदारांकडे दिले असून त्या खाजगी ट्रॅव्हल्सने नागपूरच्या दिशेने निघून गेल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार आनंद खरात, बाबा नैताम व महिला अंमलदारांच्या पथकाने तातडीने नागपूर मार्गाने धाव घेतली. वरोरा येथील आनंदवन चौकात संबंधित ट्रॅव्हल्स अडवून पोलिसांच्या पथकाने आतमध्ये झडती घेतली असता, त्यात आणखी दोन संशयित महिला आढळून आल्या.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






