Pombhurna Yuvasena Meeting held in Chandrapur district

पोंभुर्णात युवासेनेचा निर्धार: प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मैदानात उतरणार; बैठकीत इशारा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 11, 2026

पोंभुर्णा : Pombhurna Yuvasena Meeting पोंभुर्णा तालुका युवासेनेची आढावा बैठक नुकतीच अत्यंत उत्साहात पार पडली. युवासेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी युवासेना आता आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे. (हे हि वाचा – वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळाले सरप्राईज)

या बैठकीत पोंभुर्णा तालुक्यातील युवासेनेच्या संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आगामी काळातील आंदोलनात्मक भूमिका, युवकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच गोरगरीब नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी युवासेना आता आक्रमकपणे मैदानात उतरणार, असा निर्धार यावेळी करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे म्हणाले, “गोरगरीब, विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन युवासेना खपवून घेणार नाही. जनतेच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला तरी युवासेना मागे हटणार नाही. सामान्य नागरिकांचा प्रत्येक प्रश्न मार्गी लागेपर्यंत युवासेनेचा संघर्ष सुरूच राहील,” असा इशारा त्यांनी दिला.

युवासेना तालुका प्रमुख महेश श्रीगिरीवार यांच्या नेतृत्वाखाली पोंभुर्णा तालुक्यात युवासेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक गावात युवकांची मजबूत फळी उभी करून स्थानिक पातळीवरील जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासह ते मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

“जनतेच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कार्यवाही झाली पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका बैठकीत मांडण्यात आली. प्रशासनाने प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन उभारून प्रशासनाला जाब विचारण्यात येईल, असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपतालुका प्रमुख अक्षय झाडे, कृषभ बुरांडे, उपशहर प्रमुख नोकेश कपाट, रजत ढोंगे, राहुल शेडमाके, सूरज कावळे, मुकेश ठाकरे, अंकुश गव्हारे, प्रवीण सातपुते, बजरंग बल्लावार, रुणाल गुरनुले, समीर फुलझले, रुचित गद्धेकार, आकाश गज्जलवार यांच्यासह अनेक शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

युवकांची ताकद, जनतेचा आवाज आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष हीच युवासेनेची भूमिका असून, आगामी काळात पोंभुर्णा तालुक्यात जनतेच्या प्रश्नांसाठी युवासेना अधिक आक्रमकपणे काम करणार आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment