Sevadal Hostel Help Initiative bedsheet distribution to girls

क्रांती दिनी वसतिगृहातील मुलींना मिळाले खास सरप्राइज!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 10, 2026

चंद्रपूर – Sevadal Hostel Help Initiative द्वारे क्रांती दिनाचे औचित्य साधून चंद्रपुरात विशेष उपक्रम राबवण्यात आला. सेवानिवृत्त मुख्य स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनुरवार यांच्या पुढाकाराने सेवादल वसतिगृहातील विद्यार्थिनींना मदतीचा हात देण्यात आला. या कार्यक्रमात गरजू मुलींना बेडशीट आणि फळांचे वाटप करण्यात आले. सामाजिक जाणीव जपत अनेक दानशूर व्यक्तींनी या उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले. (हे हि वाचा – ११७ घरात आनंद, खासदार धानोरकर यांचे मानले आभार)

सेवादल वसतिगृहात शिकणाऱ्या मुलींना अन्न आणि निवाऱ्याची सोय उपलब्ध असली, तरीही अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने त्यांच्या इतर आवश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी हॉस्टेल अधीक्षिका कु. कोमल आक्केवार यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर क्रांती दिनाचे औचित्य साधून सायंकाळी ४ वाजता आयोजित एका विशेष कार्यक्रमात सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते या विद्यार्थिनींना उपयोगाच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मोलाचा आर्थिक हातभार लावला. यामध्ये प्रामुख्याने नगरसेविका सौ. चंदाताई वैरागडे, सौ. रोहिणी काटेखाये, सौ. वसुधा विजय पोतनुरवार, सौ. स्नेहल अबांगडे, सौ. प्रियंका खनके, सौ. मंजूषा गोठे, सौ. रुपाली बुटले, सौ. सोनाली गर्गेलवार, सौ. सपना येरावार, सौ. सुरेखाताई बुटले, सौ. सीमाताई आंबटकर, सौ. जया प्रल्हाद हजारे, विजू भोयर, राजू भोयर तसेच उदय येरेवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

सदर कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात पार पडला. या प्रसंगी मनपाचे नगर सचिव श्री. संतोष गर्गेलवार आणि सेवा स्वच्छता निरीक्षक (मनपा) श्री. भुपेष गोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल उपस्थितांनी विवेक पोतनुरवार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment