Sthaniya Lokadhikar Sena Chandrapur installation ceremony

गोमती पाचभाई बनल्या चंद्रपूर-गडचिरोली सेनेच्या नव्या अध्यक्ष

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 10, 2026

चंद्रपूर – Sthaniya Lokadhikar Sena Chandrapur चा स्थापना सोहळा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दादासाहेब कन्नमवार सभागृहात उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात गोमती शारदा मनोहर पाचभाई यांची चंद्रपूर-गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. या माध्यमातून स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी प्रभावी लढा उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. (हे हि वाचा – क्रांतिदिनीं वसतिगृहातील मुलींना मिळाले खास सरप्राईस)

शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेने तसेच स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष माजी खा. गजाननजी कीर्तिकर, कार्याध्यक्ष खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आ. डॉ. मनीषाताई कायंदे, आ. कृपाल तुमाने व हर्षलदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्थापना सोहळा आयोजित करण्यात आला. महासंघाचे सरचिटणीस श्री. अरुणजी मोरे व शिवसेना वैद्यकीय आघाडीचे जिल्हाप्रमुख ॲड. अभय वांढरे यांच्या उपस्थितीत हा स्थापना सोहळा पार पडला.

गोमती पाचभाई यांची अध्यक्षपदी तर ॲड. संदीप धानोरकर कार्याध्यक्ष

या स्थापना सोहळ्यादरम्यान गोमती शारदा मनोहर पाचभाई यांची चंद्रपूर–गडचिरोली स्थानीय लोकाधिकार सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच अॅड. संदीप अरुण धानोरकर यांची कार्याध्यक्षपदी, अॅड. मृणालिनी चंद्रप्रकाश रागीट यांची कोषाध्यक्षपदी, इंजिनीयर प्रशांत कोपुला यांची चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी तर श्री. मनोज तुलाराम कांबळी यांची गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार मा. गजाननजी कीर्तिकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्थापना सोहळ्यास उपस्थिती दर्शवून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून चंद्रपूर–गडचिरोली जिल्ह्यात स्थानीय लोकाधिकार सेनेचे संघटन अधिक मजबूत करून स्थानिक युवक, बेरोजगार, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याची प्रेरणा उपस्थितांना मिळाली.

यावेळी मा. आ. डॉ. मनीषाताई कायंदे व मा. आ. हर्षलदादा शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उपस्थित सदस्यांमध्ये अॅड. संदीप अरुण धानोरकर, इंजि. प्रशांत कोपुलवार, डॉ. आशिष मारोतराव आसुटकर, अॅड. मृणालिनी चंद्रप्रकाश रागीट, श्री. महेश लक्ष्मीकांत आक्केवार अॅड. प्रशांत मनोहरराव गिरडकर, इंजि. अभिजीत गजानन खडसे, श्री. मनोज तुळाराम कांबळी, श्री. संभाजी किसन येरगुडे, श्री. मयूर मनोहर पाऊणकर,श्री. बंडू पांडुरंग पहनपटे, श्री. स्वामी चंद्रप्रकाश रागीट, श्री. कोमल हरिदास मोहितकर, श्री. महेश दिलीप चीतारकर, श्री. सुभाष पानघाटे आणि श्री. सचिन थिपे यांचा समावेश होता.
“चंद्रपूर–गडचिरोलीतील स्थानिक युवक, बेरोजगार आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी स्थानीय लोकाधिकार सेना सदैव कार्यरत राहील.
स्थानिकांना रोजगार, व्यवसाय आणि विकासाच्या संधी मिळवून देण्यासाठी संघटितपणे प्रभावी लढा उभारू.
जनतेचा विश्वास हीच आमची ताकद असून, तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू.”

— गोमती शारदा मनोहर पाचभाई
जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर–गडचिरोली स्थानीय लोकाधिकार सेना

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment