Shinde Sena To Thackeray Sena Rajat Dhonge Sachin Madavi join Shiv Sena UBT

पोंभुर्ण्यात शिंदेसेनेला सुरुंग; तालुकाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत जाहीर प्रवेश

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 5, 2026

पोंभुर्णा / चंद्रपूर: Shinde Sena To Thackeray Sena या राजकीय बदलाने पोंभुर्णा तालुक्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण राजकीय भूकंप झाला.

युवासेना तालुकाप्रमुख रजत ढोंगे आणि तालुका संघटक सचिन मडावी यांनी कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (हे हि वाचा – चंद्रपुरात खासदार रस्त्यावर उतरल्या, ढिसाळ यंत्रणा कामाला लागली)

Shinde Sena To Thackeray Sena: पोंभुर्ण्यात राजकीय समीकरणांना नवे वळण

स्थानिक स्वराज्य संस्था व आगामी नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोंभुर्णा तालुक्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. तालुक्यातील शिंदेसेनेला मोठे खिंडार पडले असून, शिंदेसेना युवासेना तालुकाप्रमुख रजत ढोंगे तसेच शिवसेना तालुका संघटक सचिन मडावी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

हा पक्षप्रवेश युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व युवासेना उपजिल्हाप्रमुख महेश श्रीगिरीवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे पोंभुर्णा तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून स्थानिक राजकीय वर्तुळात या बदलाला मोठे महत्त्व दिले जात आहे.

युवासेना तालुकाप्रमुख रजत ढोंगे व सचिन मडावींचा ठाकरे सेनेत प्रवेश

पक्षप्रवेशावेळी रजत ढोंगे व सचिन मडावी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेच्या मूळ विचारसरणीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. आगामी काळात जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आक्रमक भूमिका घेऊन पक्षाचे संघटन गावपातळीपर्यंत अधिक मजबूत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. चंद्रपुरात युवासेना – शिवसेनेच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी कार्य्रक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला.

कार्यक्रमात बोलताना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवून रजत ढोंगे आणि सचिन मडावी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे संघटनेला नवी ऊर्जा मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून युवासेनेची फळी अधिक बळकट केली जाईल. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आक्रमक लढा उभारून पोंभुर्णा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरेल.”

या पक्षप्रवेश सोहळ्यास युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल, शिवसेना महानगर प्रमुख सुरेश पचारे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख राजेश नायडू, युवासेना चंद्रपूर शहरप्रमुख फर्दीन सय्यद, बल्लारशा समन्वयक सोहेल नवशद खान, चंद्रपूर उपतालुका प्रमुख विवान रामटेके, पोंभुर्णा शहरप्रमुख नोकेश कपाट, उपशहरप्रमुख सुरज कावळे यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदेसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे पोंभुर्णा परिसरातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून संघटनात्मक पातळीवर ठाकरे गटाची बाजू अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment