चंद्रपूर युवासेना पक्षप्रवेश सोहळ्यात पंचशील वार्डातील युवक आणि पदाधिकारी

चंद्रपूर युवासेनेला बळ, अनेक युवकांचा पक्षप्रवेश

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 13, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर युवासेना पक्षप्रवेश कार्यक्रमात पंचशील वार्डातील असंख्य युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेत प्रवेश केला. पक्षाचे नेतृत्व आणि विचार यावर विश्वास असल्याचे या युवकांनी सांगितले. हा सोहळा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी राहुल समुद् यांची चंद्रपूरच्या उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली. पक्षाच्या माहितीनुसार, या प्रवेशामुळे पंचशील वार्डात युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढली आहे. (चंद्रपूर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त वाहतुकीत बदल, वाचा हि बातमी)

चंद्रपूर युवासेना पक्षप्रवेश : कोणाच्या उपस्थितीत सोहळा?

युवासेना प्रमुख तथा आमदार मा. श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आणि युवासेना सचिव तथा आमदार वरूनजी सरदेसाई साहेब, शिवसेना सचिव सुरज भैय्या चव्हाण, युवा सेना कार्यकारिणी सदस्य हर्षल दादा काकडे तसेच चंद्रपूर जिल्हा विस्तारक श्री. संदीप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनात व युवासेना जिल्हाप्रमुख श्री. विक्रांत विजय सहारे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य युवक पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे पंचशील वार्डात युवासेनेची ताकद आणखी वाढली आहे. या विशेष प्रसंगी राहुल समुद् यांची चंद्रपूरच्या उपशहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

युवकांचा वाढता प्रतिसाद आणि विश्वास हीच संघटनेची खरी ताकद असून, युवकांच्या हक्कासाठी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि समाजाच्या हितासाठी युवासेना सदैव खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या पक्षप्रवेश सोहळ्याला चंद्रपूरचे युवासेना तालुकाप्रमुख सागर गभने, तालुका समन्वयक विवान रामटेके व पवन ऊडाके, तसेच शाहरुख शेख, चेतन जिराफे, कार्तिक महत्व, अतुल मिश्रा, आफ्रिद शेख, ऋषि बागडे, अंकित शुक्ला, गणेश राखूडे, रोशन पारोधी यांच्यासह इतर अनेक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवासेनेच्या या नवीन शिलेदारांचे युवासेनेच्या परिवारात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले असून, त्यांना पुढील वाटचालीसंदर्भात हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ‘युवाशक्ती… महाराष्ट्राची शक्ती!’ आणि ‘एकच ध्यास, युवकांचा विकास!’ हा नारा देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना, चंद्रपूरच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment