चंद्रपूर : दीक्षाभूमी वाहतूक बदल जाहीर करण्यात आले असून धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी चंद्रपूर शहरातील अनेक मार्ग बंद राहतील. जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी याबाबत आदेश काढले आहेत. हा सोहळा १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबर सकाळी ८ ते १७ ऑक्टोबर सकाळी ८ पर्यंत वाहतुकीत बदल लागू राहतील. जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग आणि पार्किंग स्थळेही निश्चित करण्यात आली आहेत. (अनधिकृत पाणी उपशावर होणार कारवाई, वाचा हि बातमी)
दीक्षाभूमी वाहतूक बदल : कोणते मार्ग बंद राहणार?
दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौध्द बांधवाची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक- जुना वरोरा नाका ते कलेक्टर बंगला रोड, हुतात्मा स्मारक जवळील रोड तसेच वरोरा नाका चौक- मित्रनगर चौक ते सिंधी पंचायत भवन व मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत या सर्व परीसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच सदरचा सर्व परीसर ‘नो पार्किंग व नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे निर्देशित काळात सदर परिसरात कोणतेही वाहने, हॉकर्स लावण्यात येवू नये.
अवजड वाहनाकरीता पर्यायी रहदारीचा मार्ग : 1) सदर अधिसुचनेच्या कालावधी दरम्यान गरजेनुसार नागपूरकडून चंद्रपुरकडे येणारी सर्व प्रकारची जड वाहने, ही हॉटेल कुंदन प्लाझा येथुन सीटीपीएस मार्गे नेहरू नगर वरून मुल रोडला जातील. 2) मुलकडून नागपुरकडे जाणारी जड वाहने ही बंगाली कॅम्प- सावरकर चौक- वरोरा नाका उड्डाणपुल मार्गाने जातील किंवा नेहरू नगर वरून सीटीपीएस मार्गे नागपुरकडे जातील. तसेच गरजेनुसार एम.ई.एल. नाका – सावरकर चौक- वरोरा नाका उडाणपुल येथे सदर वाहने थांबवण्यात येतील. 3) बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प- नेहरू नगर वरून सीटीपीएस मार्गे नागपुरकडे जातील किंवा पलीकडे बंगाली कॅम्प डि.आर.सी. बंकर, बायपास रोड येथे दीक्षाभूमी मार्गावरील अनुयायांची गर्दी पाहुन थांबवण्यात येईल.
शहरातील दुचाकी व चारचाकी (हलकी) वाहनाकरीता रहदारी व्यवस्था
जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय-मित्र नगर चौक- टि.वी. हॉस्पीटल पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाकरिता (सायकल सहीत) बंद करण्यात येत आहे. पाण्याची टाकी- विश्रामगृह- जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाकरिता (सायकल सहीत) दोन्ही बाजूने बंद करण्यात येत आहे. करिता नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळून) वरोरा नाका- उड्डान पुल- सिध्दार्थ हॉटेल- बस स्टँड- प्रियदर्शनी चौक मार्गे शहराकडे जातील.
रामनगर, मित्र नगर, आकाशवाणी, स्नेहनगर, वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची टाकी -दवा बाजार-संत केवलराम चौक- दाताळा रोड मार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने (जड वाहने वगळून) घेऊन जातील. त्याचप्रमाणे जटपुरा गेटकडून रामनगर मार्गे जुना वरोरा नाकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने पाण्याची टाकी- प्रियदर्शनी चौक- बस स्टँड- सिध्दार्थ हॉटेल -उडान पुल मार्गे नागपूरकडे जातील. दीक्षाभूमी ते संत केवलराम चौक या दरम्यान राहणा-या रहिवाशांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजुला उभी न करता घोषित करण्यात आलेल्या पार्किंगमध्ये ठेवावीत.
आय.टी.आय. कॉलेज ते जिल्हा स्टेडीयम र्यंत तसेच वरोरा नाका दर्ग्याच्या उजव्या बाजूने जाणारा रस्ता-पूट्टेवार हॉस्पीटल- बुकावार हॉस्पीटल- वरोरा नाका ते पिंक प्लॅनेट पर्यंत नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन म्हणुन घोषित करण्यात येत आहे.
दीक्षाभूमी सोहळयास येणाऱ्या नागरिकांकरिता वाहन पार्कीग स्थळ
- 1) नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरीता शकुंतला लॉन, जनता कॉलेज समोरील पटांगण (ईदगाह मैदान) 2) शहरातून दीक्षाभूमीकडे येणारे वाहनाकरीता सेंट मायकल स्कूल मैदान, सिंधी पंचायत भवन जवळील मैदान 3) वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातून दीक्षाभूमीकडे येणारी वाहनाकरीता लोकमान्य टिळक हायस्कुल (जिल्हा स्टेडीयम जवळ) 4) मुल रोड, बंगाली कॅम्प, तुकुम या परिसरातून येणाऱ्या अनुयायांनी आपली वाहने कृषी भवन जवळील ट्रॅव्हल्स स्टँड या ठिकाणी (मोटार सायकल) पार्क करावी व चारचाकी वाहने वरील दिलेल्या इतर पार्किंग स्थळी पार्क करावी.
सदर अधिसूचना 15 ऑक्टो सकाळी 8 वा. पासून 17 ऑक्टो सकाळी 8 वाजेपर्यंत अंमलात राहील. तसेच सदर अधिसूचनेच्या अमंलबजावणीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल. तरी धम्मचक अनुप्रवर्तन दिन सोहळयामध्ये सहभागी सर्व बौध्द बांधव/अनुयायी व जनतेने वरील वाहतूक व्यवस्थेचा वापर करून घोषित पार्कींग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवावी तसेच शांतता व सुव्यवस्था आबाधित राखण्यास पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






